भाविकांनी देणगीचा ओघ धार्मिक स्थळांऐवजी ज्ञानमंदिरांकडे वळवावा आणि ज्ञानमंदिरांची दुरावस्था असणाऱ्या गावाकडुन देणगी नाकारण्याचे धाडस महंतांनी दाखवावे

भाविकांनी देणगीचा ओघ धार्मिक स्थळांऐवजी ज्ञानमंदिरांकडे वळवावा आणि ज्ञानमंदिरांची दुरावस्था असणाऱ्या गावाकडुन देणगी नाकारण्याचे धाडस महंतांनी दाखवावे :- डॉ.गणेश ढवळे 
बीड:- ( दि.१५) बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची अर्थातच ज्ञांमंदिरांची अत्यंत दुरावस्था असुन लोकप्रतिनिधीं आणि जिल्हा प्रशासनाला काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे भाविकांनी आपल्या देणगीचा ओघ धार्मिक स्थळांऐवजी आपल्या गावातील ज्ञान मंदिराकडे वळवावा. ग्रामीण भागातील मुलांच्या पायाभूत शिक्षणासाठी ईमारत बांधकाम, वीजपुरवठा, स्वच्छतागृहे याकडे निधीचा अभाव असल्याचे कारणं देणारे लोकप्रतिनिधी मात्र स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी, व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून धार्मिक स्थळांना निधी देण्यात धन्यता मानत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस आल्याने काही वर्ग हनुमान मंदीरात तर काही समाज मंदिरात भरविण्यात येत आहेत.त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करता धार्मिक स्थळांना देणगी देण्याऐवजी ज्ञान मंदिरांच्या मुलभूत सुविधांसाठी देणगी द्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एकुण २४७४ शाळा असुन यात २४१५ शाळा प्राथमिक तर ५९ शाळा माध्यमिक आहेत.३४९ शाळांमधील ५९२ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या आहेत तर ४६८ शाळांमधील ८५६ वर्गखोल्यांची दुरुस्ती आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या १४२० शाळांमध्ये वीजपुरवठाच नाही त्यामुळे या शाळांमधील प्रोजेक्टर, ध्वनीक्षेपक, एलईडी, आदि डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक वीज जोडणी वरील उपकरणे धुळखात पडुन आहेत.तर जिल्हा परिषदेच्या ३१७ शाळांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत तर २४०० शाळांमध्ये साफसफाई साठी शिपायांची नियुक्तीच नाही. या अनुषंगाने लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने तसेच आंदोलनानंतर सुद्धा याचे गांभीर्य दिसून येत नाही.

महंतांनी ज्ञानमंदिरांची दुरावस्था असणाऱ्या ग्रामस्थांकडून देणगी नाकारण्याचे धाडस दाखवाव

 ग्रामीण भागातील ग्रामस्थ धार्मिक स्थळांसाठी अथवा धार्मिक कार्यक्रमासाठी मोठ्या मनाने देणगी देतात मात्र शाळांसाठी देणगी देण्यास टाळाटाळ करतात. महंतांनी ज्या गावांमध्ये ज्ञानमंदिरांची दुरावस्था असेल त्या गावातुन धार्मिक स्थळांसाठी देणगी स्विकारण्याचे अथवा धार्मिक कार्यक्रमासाठी येण्यास टाळाटाळ केली तर ज्ञानमंदिरांची दुरावस्था तातडीने दुर होईल. महंतांनी हे धाडस दाखवायला हवं.ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधीकडे धार्मिक स्थळांसाठी सभामंडप यासाठी निधी मागण्याऐवजी ज्ञानमंदिरांसाठी निधीचा आग्रह धरला पाहिजे.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !