मुळुकवाडी - लिंबागणेश - पोखरी ( घाट) येथे जरांगे पाटलांचे जंगी स्वागत

मुळुकवाडी - लिंबागणेश - पोखरी ( घाट) येथे जरांगे पाटलांचे जंगी स्वागत ; जेसीबीतुन फुलांची उधळण तर मोटार सायकल रॅली. लाडक्या भाच्याला आरक्षण कधी? लाडक्या दाजीच्या शेतमालाला भाव कधी?

बीड प्रतिनिधी :- ( दि.१३) बीड तालुक्यातील बेलगाव येथील बेलेश्वर संस्थान येथे सद्गुरू ईश्वरभारती महाराज यांच्या ८४ व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त जात असताना मुळुकवाडी,लिंबागणेश आणि पोखरी (घाट) येथील मराठा समाज बांधवांनी मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांची मुळुकवाडी येथून बेलेश्वर संस्थान पर्यंत रथातुन मिरवणूक काढली. मुळुकवाडी आणि पोखरी (घाट) या गावात जेसीबीच्या सहाय्याने फुलांची पुष्पवृष्टी केली. मुळुकवाडी ते बेलेश्वर संस्थान पर्यंत दुचास्वारांनी भगव्याध्वजासह " जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" 'एक मराठा लाख मराठा '' लढेंगे जितेंगे हम सब जरांगे" अशा घोषणांनी परीसर दुमदुमून गेला होता. लिंबागणेश येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार जरांगे पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून आशिर्वाद घेतले तर यावेळी गावातील महिला व शाळकरी मुलीनी पाटलांचे औक्षण केले.
     बेलेश्वर संस्थान येथे काल्याच्या किर्तनासाठी आलेले ह.भ.प.शिवाजी महाराज नारायणगडकर, बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती ह.भ.प.महादेव भारती आणि शांतीब्रम्ह तुकाराम महाराज यांच्या समवेत जरांगे पाटलांची सजवलेल्या रथातुन मिरवणूक काढण्यात आली.

 लाडक्या बहिणीला १५०० पण लाडक्या भाच्याला आरक्षण कधी? लाडक्या दाजीच्या शेतमालाला भाव कधी? जरांगे पाटील 

 श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे सदगुरु ईश्वर भारती महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त निमित्त मनोगत व्यक्त करताना ईश्वर भारती यांच्या पवित्र भुमी मध्ये शपथ घेऊन सांगतो मी जीव गेला तरी माझ्या समाजाला दगा देणार नाही.राजकीय पुढारी मी त्यांचे ऐकत नाही म्हणून षडयंत्र रचुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असुन माझ्या विरोधात सरकार आंदोलनासाठी माणसं तयार करत आहे ‌मणिपुर सारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल म्हणून भविष्यात दंगली घडवल्या जातील अशी मला शंका आहे पण आपण शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने आपले आरक्षण मिळवायचं तुम्ही फक्त पाठीशी रहा.लाडक्या बहिणीला १५०० रूपये महिना देणारे सरकार लाडक्या भाच्याला शिक्षणासाठी, नोकरीसाठी आरक्षण देत नाही, लाडक्या दाजीच्या शेतमालाला भाव देत नाही असा सवाल करत. शेतीमालाला भाव आणि पाणी,वीज दिली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत.
तुम्हाला भावनिक करून मतं मिळवण्यासाठी फसव्या घोषणा करीत आहे. परंतु आपण आयुष्यभर साथ देणारं आरक्षण मागायचं यावर ठाम रहायचं. राजकारणात आमची जाण्याची इच्छा नाही परंतु आरक्षण दिले नाहीतर आम्हाला निर्णय घ्यावाच लागेल त्यासाठी १७ सप्टेंबर पासुन आमरण उपोषणाला बसणार आहे.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !