मा.आ. भिमराव धोंडे यांनी ग्रामीण भागात शिक्षण संस्था सुरू करुन नंदनवन फुलवले -माजी कुलगुरू धारूरकर

 
   गुणवत्ता निर्माण करावी लागते - मा. आ. भिमराव धोंडे

आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :  
           माजी आमदार भीमराव धोंडे हे हिरा आहेत , अशा हिऱ्याला प्रकाशमान करण्याचे काम करावे त्यांच्या शैक्षणिक कामकाजाला तोड नाही ते शिक्षण क्षेत्रातील आदर्श आहेत , त्यांनी ग्रामीण / डोंगरी भागात शिक्षण संस्था सुरू करुन माळरानावर शैक्षणिक नंदनवन फुलवले असल्याचे प्रतिपादन त्रिपुरा विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. वि.ल.धारूरकर यांनी केले . 
   गुणवत्ता विकत मिळत नाही ती निर्माण करावी लागते , शिक्षकांनी अशी गुणवत्ता निर्माण करा की , आपापल्या शाळेत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची रांग लागली पाहिजे ! गुणवत्ता असेल तर दूरवरून विद्यार्थी प्रवेश घेण्यासाठी येतात . असे मत माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले .
       आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, आनंद चॅरिटेबल संस्था, किसान शिक्षण संस्था आणि छत्रपती शाहू एज्युकेशन सोसायटी आष्टी यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची शैक्षणिक सहविचार सभा मौजे गहुखेल येथील वृद्धेश्वर विद्यालयात संपन्न झाली .तसेच नुतन इमारतीचा उद्घाटन शिक्षणमहर्षी मा.आ. भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली व संपादक अनंत हंबर्डे यांच्या शुभहस्ते झाले . याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलराव बनसोडे, सौ. दमयंतीताई धोंडे, सौ. सविता धोंडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे, अभयराजे धोंडे, ह.भ.प. दिनकर तांदळे महाराज, सदाशिवराव तुपे, जि.प. सदस्या वर्षाताई माळी, सरपंच प्रतिभाताई शिंदे, सरपंच शिवाजी शेकडे , बाळासाहेब शेकडे, शिरीष थोरवे, राजेंद्र शेकडे,उपसंपादक उत्तम बोडखे, सरपंच शरद दळवी, सरपंच संजय चंदनशिव, सरपंच बागल, बाबासाहेब काकडे, माजी सरपंच अशोक माळी, म्हातारदेव शेकडे व इतरांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती . प्रारंभी स्व.बापुराव धोंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . 
    पुढे बोलताना वि.ल. धारुरकर यांनी सांगितले की , भिमराव धोंडे यांनी शैक्षणिक बाबतीत प्रचंड अशी प्रगती केली , रंजल्या गांजल्यांचे दुःख त्यांनी जाणले असून गावागावात शिक्षणाची सोय केली . शिक्षण घेण्यासाठी आकाश मोकळे केले .प्रत्येकाने आपापल्या गावातच जवळच्या शाळेत मुलांना शिक्षणासाठी पाठवावे बाहेर शिक्षणास पाठवू नका , शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मा.आ.भीमराव धोंडे यांनी स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे वेदांत आणि विज्ञान हे झोपडीपर्यंत पोहोचण्याची काम केले . त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध केल्या . आता खाजगी विद्यापीठ स्थापन करावे , नवीन शैक्षणिक धोरण म्हणजे नव संजीवनी व आनंदोत्सव होय , असेही धारुरकर यांनी सांगितले . स्व. प्रमोद महाजन व स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत मी काम केले , त्यांच्या कामाचा वसा सांभाळला . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश जगात नंबर एकच्या दिशेने वाटचाल करीत आहे . कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना संस्था अध्यक्ष व मा.आ.आमदार भिमराव धोंडे यांनी सांगितले की , अनादी काळापासून गुरुला महत्त्व आहे . आजही समाजात शिक्षकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे , सर्व सामान्यांच्या विकासासाठी शैक्षणिक संस्था सुरू करणे कायम सुरु राहील , 
मतदार संघात शेतकऱ्यांच्या मुलासाठी शिक्षणाचा यज्ञ सुरू केला असून , तो यज्ञ अशाच गतीने पुढे न्यायचा आहे . शिक्षण ही कायम चालणारी प्रक्रिया आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने आपल्या देशाला सापडलेला एक हिरा आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देश आज जगात प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे . 
 शिक्षकांनी निरोगी जीवन जगण्यासाठी दररोज पहाटे पाच वाजता उठून योगासने/प्राणायाम / इतर व्यायाम करावा . पुढे बोलताना भीमराव धोंडे यांनी स्वताच्या शालेय जीवनापासून माहिती दिली . तसेच अहमदनगर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले , पहिली निवडणूक महाविद्यालयात जिंकलो , त्यानंतर राजकारणात आलो , व शेतकरी संघटनेची स्थापना केली . आमदार झाल्यानंतर पहिली शाळा रुईनालकोल येथे सुरू केली . आमदार नसतो तर मतदारसंघाची शैक्षणिक प्रगती झाली नसती , प्रत्येक वर्षीच्या वार्षिक सहविचार सभेस फक्त शिक्षकच उपस्थित असतात , परंतु यावेळी शिक्षकांच्या सौभाग्यवती / आमच्या लाडक्या बहिणींना बोलवले . आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने लाडक्या बहिणींनी आता जबाबदारी स्वीकारून काम करायचे आहे . उद्घाटक म्हणून बोलताना संपादक प्रा. अनंत हंबर्डे यांनी सांगितले की संस्थेचे सर्व शिक्षक हे माजी आमदार भिमराव धोंडे यांचा आत्मा असुन , आता माजी हा शब्द गेला पाहिजे असे काम करायचे आहे. शिक्षकांनी ठरवले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही मी १९८० पासून आपल्या सोबत होतो . आजही तुमच्यासोबत आहे , भीमराव धोंडे यांनी शेतकऱ्यांच्या मुलासाठी शैक्षणिक संस्था काढल्या, शिक्षणाची गंगा गावागावात पोहोचवली , तेच खरे शेतकऱ्याचे नेते आहेत , आता त्यांना विधानसभेत पाठवण्यासाठी सर्वांनी मनापासून प्रयत्न करा . 
  व्दितीय सत्रात अजयदादा धोंडे यांनी सांगितले की , आपली संस्था एक कुटुंब आहे , प्रत्येकाने कुटुंब प्रमुखांचा आदेश मानला पाहिजे . गावाकडे वैयक्तिक मतभेद असतील तर त्याचा आपल्या राजकारणावर परिणाम व्हायला नको , शिक्षकांनी आपापल्या गावात जनसंपर्क वाढविला पाहिजे , गोरगरिबांच्या कल्याणासाठी साहेबांना आमदार करणे आवश्यक असुन , कोणालाही घाबरण्याचे कारण नाही आम्ही कधीही जाती भेद केला नाही . याप्रसंगी राजेंद्र शेकडे, सौ. मनिषा अशोक माळशिखरे आदीची भाषणे झाली . व्दितीय सत्रात प्रशासकीय अधिकारी प्रा. शिवदास विधाते यांनी संस्थाध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला . कार्यक्रमास भगवान तळेकर, भारत मुनोत, शहाबुद्दीन सय्यद, राजु शेकडे, सुरेश शेकडे, अंबादास शेकडे, विश्वनाथ शेकडे, युवराज वायभासे, गवळी फौजी प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत, प्रा. शिवदास विधाते, माऊली बोडखे, संजय शेंडे, यांच्या सह संस्थेचे सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सोपान शेकडे यांनी केले . तर सुत्रसंचलन सत्यवान ससाणे यांनी करून उपस्थितांचे आभार आमटे यांनी मानले .

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !