पत्रकार दयानंद सोनवणे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पाटोदा पत्रकारांकडून जाहिर निषेध


भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपींवर तात्काळ कारवाई करुन पत्रकार दयानंद सोनवणे यांच्या वर नोंद केलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा , नसता तीव्र आंदोलन केले जाईल -पत्रकार बांधवांचा इशारा

बीड जिल्हा (प्रतिनिधी --गोरख मोरे ) : 
         अवैध धंद्याची बातमी छापल्यामुळे दैनिक लोकनायकचे पत्रकार दयानंद सोनवणे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यातील पाटोदा तहसीलला , पाटोदा तालुक्यातील पत्रकार बांधव यांनी निवेदन देऊन या घटनेचा जाहिर 
निषेध करण्यात आला .
   याबाबत सविस्तर माहिती अशी की , पाटोदा तालुक्यातील अंमळनेर पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील अवैध दारु विक्री,सपोर्ट, पत्त्यांचा क्लब,मटका आदी अवैध धंद्याची बातमी दैनिक लोकनायकचे पत्रकार दयानंद सोनवणे यांनी दैनिक लोकनायक च्या दि ९ सप्टेंबर च्या अंकात छापली होती . या अवैध धंद्याची झळ तरुणाईला/महिला वर्गाला बसत आहे . तरुणाई व्यसनाधीन व जुगारी होत आहे . तसेच उसतोडणी मजुरांची आगाऊ उचलही या व्यसनात जात आहे . ही सामाजिक भावना लक्षात घेऊन अंमळनेर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते . याचा राग धरुन पोलीसांचा हफ्ता गोळा करणारा एजंट व अवैध दारु विक्री व पत्त्याचा जुगार सर्रासपणे चालवणारे तुकाराम आतकरे व अशोक वाल्हेकर यांनी रात्री डोंगरकिन्ही ते मिसाळ वाडी रोडवर गाठुन अश्लिल भाषेत शिविगाळ करुन , खाली पाडुन लाथा बुक्यांनी जबर मारहाण केली. यात पत्रकार दयानंद सोनवणे हे गंभीर जखमी झाले . याची तक्रार अंमळनेर पोलिसांत दिली . या अवैध धंदे चालकास पोलीसांचे अभय असुन त्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी त्याला बोलावून घेऊन उलट पत्रकारावरच पैसे मागतो असा आरोप करुन गुन्हा नोंद केला . हा प्रकार पत्रकारीतेला धोकादायक आहे .अवैध धंद्याची बातमी छापल्यामुळे पत्रकाराला मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली जाते , मात्र पोलिसांनी अद्यापही काही कार्यवाही केलीली नाही , भ्याड हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शासन करुन दयानंद सोनवणे यांच्या वर नोद झालेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा , नसता तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे पाटोदा तहसील कार्यालय येथे देण्यात आला . या प़सगि भाई विष्णुपंत घोलप,ज्येष्ठ पत्रकार कादरभाई चाऊस, आमेर शेख, संजय सानप,अजय जोशी, गणेश शेवाळे,हामिद पठाण,सय्यद साजेद, हारिदास शेलार,जावेद शेख,अशोक भवर, फयाज शेख,प्रदीप उबाळे,खंडागळे सर, सचिन गायकवाड यांच्या सह पाटोदा तालुक्यातील आदी पत्रकार बांधव या प्रसंगी उपस्थित होते .

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !