रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी अशोक गोरक्षनाथ सावंत व उपाध्यक्षपदी माधुरी जयराम माने यांची निवड

बीड (सखाराम पोहिकर ) आज दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणी या ठिकाणी पूर्वी असलेल्या शालेय समितीचा कार्यकाळ संपन्न झाल्यामुळे आज नवीन शालेय समिती स्थापन करण्यात आली गावातील सर्व विद्यार्थी पालक यांना नोटीस देऊन बैठकीचे आयोजन करण्यात आले असता बैठकीस सर्व पालक बहुसंख्येने उपस्थित होते बैठकीचे अध्यक्षस्थानी रांजणी ग्रामपंचायत चे सरपंच यांचे प्रतिनिधी श्री आसाराम रोडगे हे होते तर यांच्या अध्यक्षतेखाली हास्यखुशीने समितीची निवड वर्ग वाईट करण्यात आली यावेळी अध्यक्षपदी अशोक गोरक्षनाथ सावंत तर उपाध्यक्षपदी माधुरी जयराम माने तसेच सचिव परी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणीचे मुख्याध्यापक श्री गोल्हार अनिल काकासाहेब यांची निवड झाली तर शालेय शिक्षण समितीच्या सदस्य पदी अक्तर यासीन शेख वर्षा ज्ञानेश्वर जाधव अजिम जिलानी शेख कतले सदाशिव भिमराव पवार मनीषा हनुमान व तसेच ग्रामपंचायत सदस्य अर्चना भारत केंद्र शिक्षण प्रेमी शिवराज महादेव खंडागळे विद्यार्थी बाबरे प्रवीण गजानन वाघमारे पूजा दत्ता शिक्षक सदस्य साळवे संदिपान किसनराव अशा पद्धतीने नवीन शालेय समिती गठित करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री क्षेत्र सर यांनी केले व या कार्यक्रमाचे आभार साळवे सर यांनी मानून नवीन शालेय समितीच्या अध्यक्ष व सर्व सदस्य यांचे शाल श्रीफळ हार देऊन सत्कार करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम संपला असे जाहीर केले

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !