महेश आयुर्वेद महाविद्यालयात आज मोफत आरोग्य शिबीर


आष्टी( प्रतिनिधी- गोरख मोरे ) :  
             धर्मादाय उप आयुक्त कार्यालय बीड मा.प्र म चौधरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार . व राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या समन्वयाने राज्यभर सामाजिक आरोग्य शिबिरे राबविण्याबाबत आवाहन अमोघ श्या. कलोती धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले असून , सदर सामाजिक मोफत आरोग्य शिबिर महेश आयुर्वेद महाविद्यालय येथे आज दि . १३ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आले असून , सदर शिबिरामध्ये रूग्णांचे स्क्रिनिंग करणे, रक्त व इतर तपासण्या करणे, आरोग्याशी संबंधित शासकीय योजनांची माहिती देणे तसेच रोगाचे निदान झाल्यास रुग्णांवर विविध शासकीय योजना, धर्मादाय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रूग्णालये, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व संलग्नीत महाविद्यालये, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या सहयोगातून उपचार करण्यात येणार आहेत . सदर सामाजिक आरोग्य शिबिरांकरीता धर्मादाय कार्यालय हे नोडल कार्यालय आहे . तरी या आरोग्य शिबीराचा जास्तीत जास्तं गरजुनी लाभ घ्यावा असे आवाहन मा .आ.भीमराव धोंडे, सहसचिव डॉ अजय दादा धोंडे, प्रशासन अधिकारी डॉ डी बी राऊत, शिवदास विधाते,प्राचार्य डॉ.चंद्रकांत गोसावी यांनी केले आहे .

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !