वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत विमुक्त जाती अ मध्ये घुसखोरी करणाऱ्या बोगस भामटा राजपूतची एस आय टी चौकशीसाठी आंदोलन उभारणार -रामशेठ राठोड



समाजातील विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी माजलगाव मतदार संघातील तीनही तालुक्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढणार -रामशेठ राठोड


बीड प्रतिनिधी, अंकुश गवळी

विमुक्त जाती अ प्रवर्गामध्ये वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया २०२४ मध्ये बोगस राजपूत भामटा व इतरांची झालेली घुसखोरी थांबवण्यात यावी व याची एसआयटी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व बंजारा समाजावर होणारा अन्याय थांबवण्यात यावा यासाठी माजलगाव मतदार संघातील तीनही तालुक्यांमध्ये नियोजनबद्ध रित्या ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचे रामशेठ राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
आत्ताच झालेल्या सन २०२४ वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा पार पडली असून यामध्ये विमुक्त जाती अ प्रवर्गातील बंजारा समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला आहे. हा समाज प्रामुख्याने ऊसतोड कामगार म्हणून जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रात आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह व पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी ऊस तोडीचे काम करतो. यातून मिळणाऱ्या पैशातून तो आपली उपजीविका भागवतो. व याच पैशातून कुटुंबातील मुला मुलींचे शिक्षण पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो शिक्षणाला एवढा खर्च करूनही या समाजाला आरक्षणाचा फायदा होणार नसेल तर याला काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे ज्याच्या अधिकार आणि हक्काचा विषय असेल अशा लोकांना सन्मानपूर्वक तो अधिकार मिळायलाच हवा. आमचे मत कोण्या समाजाविषयी बोलून किंवा कोणाचे आरक्षणाबद्दल बोलून त्यांच्या भावना दुखवायचे नाही. परंतु जो आमचा समाज विमुक्त जाती-अ प्रवार्गामध्ये येतो यामध्ये घुसखोरी करून ओबीसी बोगस भामटा राजपूत जी जमात आहे ती आमचा जो वाटा आहे आमचा जो हिस्सा आहे तो हिसकावून घेण्याचा प्रयत्न आजवर करत आलेली आहे. तथापि आमचा जो समाज आहे तो न्याय हक्कासाठी लढा देण्यासाठी एखादा व्यक्ती सक्षमपणे समाजाच्या पाठीशी उभा राहत नाही यामुळे या समाजावर अन्याय होत आहे. याच अनुषंगाने समाजास न्याय मिळावा यासाठी माजलगाव मतदार संघातील तीनही तालुक्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चा नियोजन बद्ध आखणार आहे. आणि त्या माध्यमातून शासन, प्रशासनाला सुचवतो की, जे आमच्या समाजातील वंचित आणि गरीब लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत यांच्यावर अन्याय करण्याचे वेळीच थांबाव झालेल्या प्रकारावर वेळीच एसआयटी लागू करून आमच्या समाजाला न्याय देण्याचे काम करा. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे रामशेठ राठोड यांनी कळवले आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !