चौसाळा महाविद्यालयात पोषण माह उत्साहात साजरा



चौसाळा – कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा येथे गृहशास्त्र विभागातर्फे पोषण माह चे उदघाटन संपन्न झाले.सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून संपूर्ण देशात साजरा करण्यात येतो. विधार्थ्याना सकस पोषण आहाराचे महत्व कळावे. त्यांचात त्याबद्दल जागृती निर्माण व्हावी त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा.सौ.सीमा पवार यांनी पोषण आहाराचे आपल्या जीवनातील महत्व अधोरेखित केले.तर अध्यक्षीय भाषणात प्रा.गणपती ढवळशंक म्हणाले की, विद्यार्थी जीवनात शरीराचे योग्य पोषण झाले तरच आपला व्यक्तीमत्व विकास होतो व आपण परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावू शकतो. प्रा.डॉ.शाहीन सय्यद यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, या पोषण माह्च्या निमित्ताने विधार्थ्यांमध्ये पोषण आहाराबद्दल जागृती निर्माण व्हावी म्हणून महिनाभर रांगोळी स्पर्धा,भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, विद्यार्थी सेमिनार अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ.विलास भिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी उपप्राचार्य प्रा.चांगदेव शेळके, पदयुत्तर संचालक डॉ.सुधाकर वणवे, प्रा.भागवत कुरुंद, डॉ.मंजुषा रसाळ,प्रा.अरुणा नावेकर,प्रा.मनीषा गिराम, श्रीमती सारिका सवाई, प्रा.स्वाती हांगे, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !