मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ सेवकांच्या सहकारी पतसंस्थेकडून ईशांत मनोज बचुटे सन्मानित


बीड (प्रतिनिधी) - शहरातील ईशांत मनोज बचुटे या विद्यार्थ्याने सन २०२३-२४ यावर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९१.६०% गुण घेऊन विशेष प्राविण्‍याने यश मिळविल्यामुळे त्याचा औरंगाबाद येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ सेवकांच्या सहकारी पतसंस्थेकडून सन्मान चिन्ह आणि ₹१५००/- रोख असे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. हा सन्मान इशांत ने आजोबा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक रमेशराव गंगाधरे यांच्या सोबत स्वीकारला. यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष किरण आवरगावकर, शमीम भाई, माळी साहेब यांच्यासह पतसंस्थेचे अध्यक्ष ए.एस.भोसले, उपाध्यक्ष आर.बी. खडेकर, सचिव डी.के. काळे, खजिनदार श्रीमती एस.एस. सरोवर यांची प्रमुख उपस्थिती होती. ईशांत मनोज बचुटे याचे औरंगाबाद येथील पतसंस्थेकडून प्रथम पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हृदयी शुभेच्छा देण्यात येत आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !