अरविंद केजरीवाल यांची जमानत मंजूर बीडमध्ये आम आदमी पार्टीचा जल्लोष


 सत्यमेव जयते सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं-माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी
बीड प्रतिनिधी :-आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा माननीय अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांचे आज सुप्रीम कोर्टाने जमानत मंजूर केली या देशातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने विरोधकांना सीबी आणि ईडीच्या माध्यमाने सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचे काम करण्यात आले आणि याच सीबीआय वरती सुप्रीम कोर्टाने आज प्रश्नचिन्ह निर्माण केल्या या भारतीय जनता पार्टीने सीबीआय ईडी चा वापर करून आम आदमी पार्टीच्या नेत्यांना पाठीमागील काही दिवसापासून नाही तर वर्षापासून जेलमध्ये टाकण्याचे काम केले आणि आज या भारतीय जनता पार्टीला एक चपराक देण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केले आहे आणि अरविंद केजरीवाल यांना जामीन देऊन सत्यमेव जयते सत्य परेशान हो सकता है पराजित नही या म्हणीप्रमाणे सत्य करून दाखवले आहे याच खुशीमुळे बीड येथे बसेर्गन चौकात आम आदमी पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने तोफा व पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष सय्यद सादिक शहराध्यक्ष अजून खान तालुका उपाध्यक्ष रफिक पठाण अल्पसंख्याक विभाग प्रमुख युवा नेते प्रवीण आनेराव अक्रम शेख इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !