जिल्हा कोषागार अधिकारी श्री. गळगुंडे यांचा जि.प महासंघातर्फे सत्कार.



बीड प्रतिनिधी:-

आज दिनांक 13/09/2024 रोजी बीड जिल्हा कोषागार अधिकारी पदी लहुजी गळगुंडे नियुक्ती झाल्याने त्यांनी 12 ऑगस्ट रोजी कोषागार अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यामुळे ग्रामसेवक युनियन तालुका शाखा व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ बीड यांच्या मार्फत मा. लहुजी गळगुंडे यांचा शाल श्रीफळ, पुष्गुच्छ देऊन सत्कार कर्मचारी महासंघ चे जिल्हाध्यक्ष बळीराम उबाळे, जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामसेवक युनियन तालुका अध्यक्ष अशोक चव्हाण, संचालक रमेश कदम, रामेश्वर जाधव, गौतम वाघमारे, चंद्रकांत हेंद्र , नंदकिशोर जाधव, सिद्धू गिरी, नियंत्रक श्रीमंत उबाळे, यांच्या हस्ते यथोचीत सत्कार करण्यात आला. व त्यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी उबाळे यांनी सांगितले की गळगुंडे साहेब हे आधी ग्रामसेवक म्हणुन कार्यरत होते त्यांनी अत्यंत जिद्दीने, चिकाटीने, हुशारीने अभ्यास करून त्यांनी लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा देऊन अव्वल स्थानावर उत्तीर्ण होऊन त्यांची जिल्हा कोषागार अधिकारी पदी निवड झाली. ते शेतकरी कुटुंबातील आहेत. व त्यांनी सर्व कर्मचारी यांना सहकार्य करावे असे आव्हान केले.
स्त्कराला उत्तर देताना श्री. गळगुंडे साहेब यांनी सांगितले की कर्मचारी यांचे वेतन 1 तारखेला देण्याचे त्यांचे प्रयत्न असणार आहेत. कर्मचारी यांचे कामे प्राधान्याने सोडविले जातील. कर्मचाऱ्यांना 100% सहकार्य राहील व gst बाबत कार्यशाळा आयोजित करून कर्मचाऱ्यांना यथासांग मार्गदर्शन करण्यात येइल असेही त्यांनी सांगितले, शेवटी रामेश्वर जाधव यांनी सर्वांचे मनापासून आभार मानून सत्कार सभारंभ संपला असे जाहीर केले.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !