पहाडी पारगाव उच्च जिल्हा परिषद शाळा भरते ग्रामपंचायत कार्यालयात आणि समाज मंदिरात ; नविन इमारत निधीची मागणी

पहाडी पारगाव उच्च जिल्हा परिषद शाळा भरते ग्रामपंचायत कार्यालयात आणि समाज मंदिरात ; नविन इमारत निधीची मागणी:- डॉ.गणेश ढवळे 
बीड:-( दि.१६) धारूर तालुक्यातील पहाडी पारगाव उच्च प्राथमिक जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत जुनी झाल्याने २ सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळेच्या खोल्या ढासळल्या वर्ग भरवण्याची अडचण झाली असुन काही दिवस मारोती मंदिरात वर्ग भरवले जात मात्र सध्या त्या ठिकाणी गणपती बसविण्यात आल्याने सध्या ग्रामपंचायत कार्यालय आणि समाजमंदिरात वर्ग भरवले जात असुन नविन शाळा इमारतीसाठी निधी देण्यात यावा सामाजिक कार्यकर्ते यासाठी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी दि.१७ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा ईशारा दिल्यानंतर भगवान फुलारी शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) जिल्हा परिषद बीड यांनी इमारत बांधकामासाठी निधी उपलब्धतेसाठी जिल्हा वार्षिक नियोजन बीड व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांना प्रस्ताव पाठवल्याचे लेखी कळवले आहे.

दरवर्षी वार्षिक अहवालात धोकादायक इमारत असुन नविन इमारतीसाठी निधीची मागणी करूनही दुर्लक्ष केले जाते:- परमेश्वर साखरे ( मुख्याध्यापक जि.प.शाळा पहाडी पारगाव)

पहाडी पारगाव जिल्हा परिषद शाळा इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत असुन विद्यार्थी पटसंख्या १४७ आहे.शाळेची ईमारत जुनी असुन गेल्या वर्षी एक वर्गखोली ढासळली होती तर २ सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन वर्गखोल्या ढासळल्याने विद्यार्थ्यांना बसण्याची अडचण होत आहे.दरवर्षी युडायस वार्षिक अहवाल देताना शाळेच्या धोकादायक इमारतीचा व नविन वर्गखोल्यांची आवश्यकता असल्याचा अहवाल शिक्षण विभागाला दिला जातो परंतु अद्याप याकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याचे दिसून येते.अशी खंत शाखेचे मुख्याध्यापक परमेश्वर साखरे यांनी व्यक्त केली.

वर्गखोल्या नसल्याने ग्रामपंचायत मध्ये वर्ग भरवले जातात; तातडीने नविन ईमारत बांधकामासाठी निधी द्यावा:- हनुमंत मुंडे उपसरपंच पहाडी पारगाव 

पहाडी पारगाव उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळेची इमारत १९६० सालची असुन जीर्ण झालेली आहे. पावसाळ्यात वर्गखोल्या गळत असुन ईमारत धोकादायक असुन नविन वर्गखोल्यांसाठी निधी मिळावा अशी मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद बीड यांना शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत मार्फत करण्यात येते परंतु दुर्लक्ष केले जाते.यावर्षी ३ वर्गखोल्या ढासळल्याने काही वर्ग मारोती मंदिरात भरवण्यात येत होते मात्र मारोती मंदिरात गणपतीची स्थापना झाल्यानंतर आता ग्रामपंचायत कार्यालयात तर काही समाज मंदिरात भरविण्यात येत आहेत.लवकरात लवकर निधी द्यावा.अशी मागणी उपसरपंच हनुमंत मुंडे यांनी केली आहे.

 गेल्यावर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या १००० कोटी विकास निधीच्या घोषणा हवेतच विरल्या :- डॉ.गणेश ढवळे 

गेल्यावर्षी १६ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष निमित्त मंत्रीमंडळाची बैठक घेतली होती.त्यात मराठवाड्यासाठी ४५ हजार कोटी व बीड जिल्ह्यासाठी १००० कोटींच्या प्रकल्प व विकास कामांची घोषणा करण्यात आली होती यात शाळांसाठी २० टक्के निधींची अंमलबजावणी करण्याची घोषणा हवेतच विरली.बीड जिल्हायातील जिल्हा परिषदेच्या ३४९ शाळांमधील ५९२ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या असुन ४६८ शाळांमधील ८५६ वर्गखोल्यांची दुरुस्ती आवश्यक आहे मात्र याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !