उपोषन कर्ता महीलेच्या निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

येवता: प्रतिनिधी:आप्पाराव सारूक दि.१२
केज तालुक्यातील हनुमान वस्ती येथील शाळेतील शालेय पोषण आहार कामगार महिलेने सहा महीने काम करूनही मानधन दुस-याच महीलेच्या नावाने पाठविल्या मुळे दीपाली सारुक यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.या निवेदनाची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आसुन उपोषण करणा-या महिलेला उपोषणापासुन परावृत्त करण्याचे आदेश गटविकास अधिकारी,व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत...

 केज तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमानवस्ती या शाळेत फेब्रुवारी-२०२४ रोजी शालेय पोषण आहार, कामगार शाळा व्यवस्थापम समिती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमानवस्ती केल्यानंतर समितीने तो बैठकीत बहुमताने मंजूर करून,नविन मदतणीस म्हणुन दीपाली सारुक या महीलेची नियमा प्रमाणे नियुक्ती करून गट साधन कार्यालय,केज यांना समितीने तसा प्रस्ताव सादर केला असुन ही व्यस्थापण समीतीच्या अधिकाराला गटसाधन केंद्राच्या अधिका-यांनी घो दाखवुन फेब्रुवारी-२०२४ ते सप्टेंम्बर-२०२४ दरम्यान शालेय पोषण आहाराचे मानधन प्रत्यक्ष काम करणा-या दिपाली सारूक यांच्या नावाने मुख्याध्यापकाने बील सादर करुनही राजकीय दबावापोटी सहा महीन्यापुर्वी राजीनामा दिलेल्या व सहा महिन्यापासून कामावर नसलेल्या सुमीत्रा चौरे या महीलेच्या बॅक खात्यात जमा केले आहे...
       काम करणाऱ्या महिलेने जिल्हाधिकारी बीड यांना मामधन बँक खात्यात जमा न झाल्यास कुटूंबासह अमरण उपोषनास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार...

शालेय व्यवस्थापन समीतीने माझी सहा महीन्यापुर्वी शालेय पोषण आहार कामगार मदतनीस म्हणुन नियुक्ती केली आसुन, सहा महिन्या पासुन मी शालेय पोषन आहाराचे अन्न(खिचडी) नियमित तयार करून विधार्थ्यांना वाटप करून देखरेख करीत आसतानाही माझ्या खात्यावर मानधन पाठविले नाही .मी काम करुनही मला मानधन मीळाले नसल्यामुळे या सहा महिन्याचे मानधन मला मिळावे यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालया,समोर कुटूंबीयांसह उपोषनाला बसणार आसल्याची माहीती दीपाली सारुक यांनी लोकमतशी बोलताना दिली.

                

                    
गट शिक्षणाधिका-यांना पत्र...

या प्रकरणी गटविकास अधिकारी सम्रद्धी दिवाणे यांचेही संपर्क साधला आसता ,जिल्हाधिकारी यांनी पत्र देवून दीपाली सारुक यांचे बील का? काढले नाही.याची चौकशी करून त्यांना उपोषण करण्यापासून परावृत्त करण्याच्या सुचना दिल्या आहेत.त्या प्रमाणे गट शिक्षणाधिकारी यांना पत्र पाठवुन या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे त्यांना सुचित करण्यात आल्याची माहीती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !