सद्गुरू ईश्वरभारतींचा भुतलावर अवतार सकल जीवांच्या उद्धारासाठीच:- महंत शिवाजी महाराज नारायणगडकर

लिंबागणेश:- ( दि.१५) विसाव्या शतकातील महान संत विभुती ईश्वर भारती महाराजांच्या पुण्यतिथी उत्सव निमित्त बीड तालुक्यातील श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथील गेल्या ३ दिवसाच्या भव्य पुण्यतिथी उत्सवाची सोहळ्याची सांगता धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायणगड महंत शिवाजी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने दि.१३ शुक्रवार रोजी झाली.यावेळी महंत शिवाजी महाराज नारायणगडकर यांनी संत हे जगाच्या उद्धारासाठी भुतलावर येत असतात.असंख्य लोकांमध्ये एखादाच सद्गुरू ईश्वरभारती बाबांसारखा उद्धारक प्रत्येक परीसराला मिळत ज्यांच्या परिस्पर्शाने जीवाचं सोनं होतं.अनेक दु:खाचे , समस्याचे निराकरण जर तुम्हाला व्हावं असं वाटत असेल तर सद्गुरू ईश्वरभारती बाबांचं दर्शन घेताच तुम्हाला मार्ग सुचेल,दिशा मिळतील.आपल्या बीड जिल्ह्याचं भाग्य आहे की सद्गुरू बंकटस्वामी महाराज, सद्गुरू नगदनारायण महाराज, सद्गुरू भगवान बाबा यासारखे संत महात्मे आपल्या बीड जिल्ह्याला लाभलेले आहेत.पुर्ण समाज गुण्यागोविंदाने नांदत आहे.संत हे देवाशी एकरूप होऊन जगाचा उद्धार करण्यासाठीच भुतलावरती येऊन सकल जीवांचा उद्धार करत असतात असे प्रतिपादन केले.यावेळी प्रमुख उपस्थिती बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती महंत लक्ष्मण मेंगडे महाराज, नाना महाराज कदम नेकनुर,रंजीत महाराज शिंदे नेकनुर, मारोती महाराज चोरमले बेनसुर, संतोष महाराज भारती मुंगसवाडी, अर्जुन महाराज तुपे डोंगर पाटोदा, नाना तकीक, राष्ट्रवादी बीड विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर,बळीराम गवते, भागवत तावरे, डॉ.गणेश ढवळे, बाळासाहेब मोरे यांच्यासह पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती होती.

शांतीब्रम्ह तुकाराम महाराज यांच्या सजवलेला रथ , दुचाकी रॅली नियोजनातुन विराट सोहळा संपन्न

बेलेश्वर संस्थानचे मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम महाराज यांच्या नियोजनातुन सद्गुरू ईश्वरभारती महाराजांच्या पुण्यतिथी उत्सव सोहळ्याला विराट रूप आले होते.मुळुकवाडी - लिंबागणेश -बेलेश्वर सजवलेल्या रथातुन नारायणगड मठाधिपती महंत शिवाजी महाराज, मनोज जरांगे पाटील यांची मिरवणूक काढण्यात आली.रथासमोर भगवे झेंडे हाती घेऊन ५०० तरूणांची दुचाकी रॅली काढण्यात आली.मुळुकवाडी ,लिंबागणेश, पोखरी (घाट) जेसीबीतुन रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.अगोदर
सकाळी ईश्वरभारती महाराजांच्या समाधीचा अभिषेक करण्यात आला.३ दिवसीय कार्यक्रमात ह.भ.प.एकनाथ महाराज गाडे चकलांबा,ह.भ.प.राजेंद्र महाराज वाघमारे गोंदीकर यांचे किर्तन, सकाळी प्रवचन,हरिजागर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !