बाबरी मुंडेंनी संपूर्ण धारुर तालुका पिंजून काढला,गावोगावी संवाद दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद



वडवणी,दि.१२(प्रतिनिधी)

 माजलगाव विधानसभा मतदार संघाचे युवा नेते बाबरी मुंडे यांचा कार्यकर्त्यांच्या व सर्वसामान्यांना माणसांच्या समस्या जाणून घेण्यासाठी धारुर तालुक्यात जनसंपर्क संवाद दौऱ्याला सुरुवात केली असून गावोगावी युवा ते सर्वसामान्य मतदार राजाकडून बाबरी मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात येत असून त्यांच्या या जनसंवाद दौऱ्याला जनतेतून मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. आपल्या हक्काचा माणुस यावेळेस विधानसभेत पाहिजे अशी काहीशी भावना आता थेट जनतेतूनच व्यक्त होत आहे. 
                             माजलगाव विधानसभा मतदारसंघातील यावेळच्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणुक, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण व जातीय समीकरणे यामुळे खुपचं अटीतटीची व अतिशय प्रतिष्ठेची यंदाची ही निवडणुक असणार हे आतापासूनच दिसून येत आहे. विधानसभेची रणधुमाळी अवघ्या काही दिवसांतच सुरु होणार असून इच्छूकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून ते सध्या माजलगाव विधानसभा मतदारसंघात फिरत आहेत. याच अनुषंगाने भाजपाचे युवा नेते बाबरी शेठ मुंडे यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघातील धारुर तालुक्याचा झंझावती दौरा करुन हा तालुका पिंजून काढला आहे. विशेष म्हणजे तळागाळातील जनतेतून त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. बाबरी मुंडे यांची संपूर्ण माजलगाव मतदार संघातील सर्वच जाती-धर्मातील युवकांमध्ये सुरुवातीपासूनच चांगली क्रेझ असून माजलगाव विधानसभा लढण्यासाठी ते इच्छुक आहेत. बाबरी मुंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय कार्यात अग्रेसर आहेत. दातृत्व तर त्यांच्या रक्तातच असून त्यांची युवकांचे हृदयसम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यांची त्यांना जाण आहे. त्यांनी सध्या धारुर तालुक्याचा दौरा सुरु केला असून प्रत्येक गावात गाठीभेटी घेवून मतदारांसोबत चर्चा करुन संवाद दौरा चालू केला आहे. व प्रत्येक गावात त्यांचे वाजत गाजत व फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करत जोरदार स्वागत केले जात असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. धारुर तालुक्यातील सोनीमोहा, जहांगीरमोहा आंबेवडगाव, चारदरी, थेटेगव्हाण, चोरंबा, चौंडी, गावंदरा, भोगलवाडी, काटेवाडी, देवदहिफळ, संगम, कासारी, बोडखा, फकीर जवळा, खाडेवाडी, चोपणवाडी, जैतापूर सह आदी गावांत दौरा केला असून माजलगाव विधानसभा लढवण्यासाठी बाबरी मुंडेंनी संपूर्ण धारुर तालुका पिंजुन काढला आहे.

Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !