लिंबागणेशमध्ये मयुरेश्वराची विसर्जन मिरवणूक राजेशाही थाटात



बीड:- ( दि.१२) एक गाव एक गणपतीची २५० वर्षाची परंपरा असलेल्या बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील सरकार वाड्यात प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या मयुरेश्वर गणेशाची आज दि.१२ गुरुवार रोजी दुपारी १ वाजता सामुदायिक आरतीनंतर मुर्ती सागवानी पालखीत ठेऊन सरकारवाडा येथून छत्री,अब्दागिरी,ध्वज, दंड अशा राजेशाही थाटात विसर्जन 
 मिरवणुकीला सुरुवात झाली. सरकार वाड्याच्या बाहेर आल्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात भजनी मंडळींनी ठेका धरला तर ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथकातील तरूणांनी आपले कसब दाखवले.
पालखी समोर धोतराच्या पायघड्या अंथरूण स्वागत करण्याचा मान परीट समाज बांधवांचा असतो. गावातील मारोती मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर कैकाडवाड्यात सजवलेल्या बैलगाडीत मयुरेश्वराची मुर्ती पंचक्रोशीतील गणेशभक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली. १२ वाड्यातील लेझीम पथके यांनी सहभाग घेतला होता. सायंकाळी ७ वाजता पुन्हा तेथून मयुरेश्वराच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असुन रात्री ९ वाजता भालचंद्र गणपती मंदिराच्या चंद्रपुष्करणी तिर्थात महाआरती नंतर विसर्जन होणार आहे. दरम्यान गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नेकनुर पोलिस ठाण्याच्या वतीने कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राजकीय मातब्बरांनी पालखीला खांदा देत मनोभावे घेतले दर्शन 

लिंबागणेश येथील मयुरेश्वर गणेशाच्या विसर्जन मिरवणूकच्या पार्श्वभूमीवर आ.संदिप क्षीरसागर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, योगेश क्षीरसागर यांनी लिंबागणेश येथे भेट देत मयुरेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन पालखीला खांदा दिला.


Comments

News23marathi

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

ईगतपुरी विधानसभा मतदारसंघावर उ.बा.ठा.शिवसेनेने ठोकला दावा

हिरापूर येथील पुलावर पाच महिण्याच आर्भक सापडले,पण कुत्र्याने तोडले लचके !