अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करा – नगरसेवक संतोष जाधव
पाटोदा (प्रतिनिधी ) अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका तसेच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच डाळिंब, आंबा आदी फळबागांनाही मोठा फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांचे हातात आलेले उत्पन्न पूर्णपणे धोक्यात आले आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामे पूर्ण करावेत, अशी मागणी नगरसेवक संतोष जाधव यांनी केली आहे शेतकरी आधीच विविध संकटांचा सामना करत असून आता अवकाळी पावसामुळे त्यांची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. विशेषतः फळबाग धारक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना त्वरित मदत मिळणे अत्यावश्यक आहे.दरम्यान, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावा. नुकसानग्रस्त शेतकरी व फळबाग धारकांना दिलासा देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत करावी अशी नगरसेवक संतोष जाधव यांनी केली आहे.
Comments
Post a Comment