संत गाडगेबाबा स्वच्छता मिशन ५२ चा व शिवरात्री,शिवजयंती व पवित्र रमजान पूर्वसंध्येला भव्य शुभारंभ बीड करांची सेवा स्वच्छ मनाने करनार- आ.विजयसिंह पंडित

संत गाडगेबाबा स्वच्छता मिशन ५२ चा व शिवरात्री,शिवजयंती व पवित्र रमजान पूर्वसंध्येला भव्य शुभारंभ बीड करांची सेवा स्वच्छ मनाने करनार- आ.विजयसिंह पंडित 

स्वच्छ, सुंदर आणि आदर्श बीडसाठी सर्वपक्षीय एकजूट आवश्यक-प्रेमलताताई पारवे..

अजितदादा पवार यांच्या कल्पनेतील स्वच्छबीड सा साठी प्रयत्न करणार-शेख निजाम 
बीड प्रतिनिधी :बीड शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संत गाडगेबाबांच्या प्रेरणेने राबविण्यात येणाऱ्या ‘संत गाडगेबाबा स्वच्छता मिशन ५२’ या व्यापक अभियानाचा आज उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ आमदार विजयसिंह राजे पंडित यांच्या हस्ते संपन्न झाला. स्वच्छता हीच सेवा आणि स्वच्छ शहर हीच खरी प्रगती या संकल्पनेवर आधारित ही मोहीम शहरातील सर्व प्रभागांमध्ये सातत्याने आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रेम लताताई पारवे, शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या ज्योतीताई मेटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, प्रज्ञाताई खोसरे, उपाध्यक्ष विनोद मुळूक, कल्याणराव आखाडे, गटनेते फारुख पटेल, गटनेते खुर्शिद आलम, डॉ. मुंडे, डॉ. जानवळे, अ‍ॅड. कोल्हे, शांतीलाल पटेल, मुळे, बोरा साहेब तसेच नगरपालिकेचे सर्व सभापती, नगरसेवक, अधिकारी व स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मध्यम प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे भागवत तावरे यांनी केले. त्यांनी स्वच्छता मोहिमेची पार्श्वभूमी, उद्दिष्टे आणि शहर विकासातील महत्त्व यांचा समतोल व नेमका आढावा उपस्थितांसमोर मांडला.
प्रस्ताविक मांडताना स्वच्छता व वैद्यक सभापती निजाम शेख यांनी ‘मिशन ५२’ची सविस्तर माहिती दिली. शहरातील प्रत्येक प्रभागात विशेष स्वच्छता मोहीम राबवून रस्ते, नाले, बाजारपेठा, शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालय परिसर, धार्मिक स्थळे तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. साचलेला कचरा हटविणे, सांडपाणी व्यवस्थापन सुधारणे, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी उपाययोजना करणे, घराघरातून ओला व सुका कचरा वेगळा संकलित करणे आणि व्यापक जनजागृती करणे ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी नमूद केले.

महाशिवरात्र, रमजान आणि शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांच्या परिसरात विशेष स्वच्छता उपक्रम राबवून भाविकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि विशेष पथके सतत कार्यरत राहणार आहेत.

अध्यक्षीय भाषणात आमदार विजयसिंह पंडित यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करताना स्व. अजित पवार यांच्या स्वच्छतेविषयी असलेल्या दृष्टीकोनाचा उल्लेख केला. स्वच्छता ही विकासाची पहिली पायरी असून दादांच्या स्वप्नातील बीड हे प्रगत, शिस्तबद्ध आणि आदर्श शहर म्हणून घडविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. “ही मोहीम सातत्यपूर्ण राहील. प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून बीड राज्यात आदर्श ठरेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बीडच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही आणि एकनाथ शिंदे साहेब आपल्या सोबत आहोत, असे सांगत शहराच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही दिली.

तसेच उपाध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती यांनी बीड शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या सुधारासाठी व्यापक नियोजन सुरू असल्याचे सांगितले. शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करून पाण्याचे नियोजन, वितरण व्यवस्था आणि तांत्रिक सुधारणा यावर काम सुरू असून लवकरच नागरिकांना नियमित, योग्य आणि दर्जेदार पाणीपुरवठा करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वच्छता मोहीम अखंडपणे आणि सातत्याने सुरू ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शिवसंग्रामच्या राष्ट्रीय नेत्या ज्योतीताई मेटे यांनी स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन केले. कचरा वर्गीकरण, नियमित संकलन आणि नागरिकांचा सहभाग यामुळे शहर अधिक सक्षम व स्वच्छ बनेल, असे त्यांनी नमूद केले.

आभार प्रदर्शन करताना गटनेते खुर्शिद आलम यांनी या उपक्रमाचे स्वागत करून सर्वांनी स्वच्छतेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा,

स्वच्छता मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योतीताई विनायकरावजी मेटे, बीडच्या नगराध्यक्षा श्रीमती प्रेमलताताई पारवे, संपादक शेख मुजीब, उपनगराध्यक्ष श्री. विनोद मुळूक, गटनेते श्री. फारुक पटेल, स्वच्छता सभापती श्री. शेख निजाम, श्री. बाळासाहेब गुंजाळ, श्री. कल्याणराव आखाडे (प्रदेशाध्यक्ष, ओबीसी सेल, रा.काँ.पा.),सौ. प्रज्ञाताई खोसरे (जिल्हाध्यक्ष, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, बीड), श्री. खुर्शीद आलम (नगरसेवक तथा गटनेते), मुख्यधिकारी श्री फडसे . स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव,सम्राट कदम,भरत चांदणे.बाळासाहेब कोल्हे (जेष्ठ विधिज्ञ), श्री. इंजि. राहुल बोरा (अध्यक्ष, रोटरी मिड टाऊन), श्री. शांतीलाल पटेल (मा. अध्यक्ष, बीड जिल्हा व्यापारी महासंघ), डॉ. श्री. अनंत मुळे (अध्यक्ष, आयएमए बीड), श्री. अशोक शेटे (कार्याध्यक्ष, बीड जिल्हा व्यापारी महासंघ), श्री. भास्करराव जाधव (अध्यक्ष, बीड जिल्हा व्यापारी ) डॉ. संजय जानवळे (बालरोग तज्ज्ञ), डॉ. सुरेश मुंडे (ऑर्थोपेडिक तज्ज्ञ, रेणू हॉस्पिटल), श्री. राजूशेठ मुनोत (व्यापारी संघटना असोसिएशन), श्री. शेख नवाज (अध्यक्ष, क्रेडाई), श्री. चिंचोलकर श्रीपाद (अध्यक्ष, कन्सलटन्सी इंजिनियर असोसिएट्स), श्री. नितीन गोपन (पतंजली, बीड), श्री. भागवत तावरे (माध्यम प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), श्री. शेख वकील सर (शिक्षक संघटना), श्री. खमरुल इमान (संपादक, दै. बीड संघर्ष), श्री. शेख मुनिरोद्दीन इनामदार (मुजावर संघटना), सौ. आरती बनसोडे (सभापती, महिला व बालकल्याण),नगरसेवक श्री.मोइन मास्टर, भिमराव वाघचौरे ,श्री. दिनेश मुंदडा , सुरज चुगडे,राणा चव्हाण, शेख अफसर, शेख खय्युम इनामदार, सौ. मिना गोडसे , सौ. पायल दत्ता जाधव, नगरसेविका,कुरेशी हिना वाजेद , सौ. चक्रे शितल राष्ट्रवादी चे मोमीन जुबेर, सत्तार इनामदार, फारुख शेख, रहेमत पठाण, अल्पसंख्याक विभागाचे शहर अध्यक्ष शेख शाकेर, उपाध्यक्ष जाणी मामू,नगर परिषद सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग इतर सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते...
‘चला स्वच्छतेशी प्रेम करू’ या भावनेतून सुरू झालेली ‘संत गाडगेबाबा स्वच्छता मिशन ५२’ ही मोहीम बीड शहराच्या विकासातील एक ऐतिहासिक पाऊल ठरत असून प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून स्वच्छ, सुंदर आणि आदर्श बीड घडविण्याचा निर्धार या शुभारंभ सोहळ्यात दृढ करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्तावित सभापति शेख निजाम तर सूत्रसंचालन भागवत तावरे आभार खुर्शीद आलम यानी मानले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी