महावितरणाच्या मनमानी कारभाराविरोधात शिरूर कासार येथे १६ फेब्रुवारी २०२६ सोमवारी बोंबा ठोक आंदोलन

महावितरणाच्या मनमानी कारभाराविरोधात शिरूर कासार येथे १६ फेब्रुवारी २०२६ सोमवारी बोंबा ठोक आंदोलन

   शिरूर कासार तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिक/ शेतकरी बांधवांनी बोंबा ठोक आंदोलनात सहभागी व्हावे- सोपान( काका) मोरे/ आजिनाथ ( भाऊ ) खेडकर
आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) :  
          शिरूर कासार ( जिल्हा बीड ) तालुक्यात महावितरण कंपनीच्या मनमानी आणि भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील सर्व स्तरातील नागरिकासह शेतकरी बांधव हैराण झाल्याने या अन्यायाविरोधात दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ सोमवार रोजी शिरूर कासार येथे बोंबा ठोक आंदोलन करण्यात येणार आहे .
  ग्रुप ग्रामपंचायत जाटनांदुर अंतर्गत कार्यरत असलेल्या लाईनमनच्या जागी दोन नवीन कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांची अत्यंत गरज असून नियुक्ती करावी व चावरवाडी येथील राजू माणिकराव खेंगरे यांच्या घरावरील मुख्य वाहिनीचा पोल तात्काळ हटवण्यात यावा या प्रमुख मागण्या आंदोलनात मांडण्यात आल्या .
  या संदर्भात दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी महावितरण प्रशासनाला या संदर्भात निवेदन देण्यात आले मात्र अद्याप याची दखल न घेतल्याने शेतकऱ्यांच्या मनात तीव्र संतापाची लाट उसळली .
  तुटलेली विज तार जोडणे ,डीपी दुरुस्ती,नविन पोल बसवने , फ्युज बदलने ,अशी अनेक कामे शेतकरयाना स्वतःच्या पैशाने करावी लागतात असा अरोप करणयात आला असुन कपनी कोणताही खर्च करत नसलयाने शेतकरयानी या प़सगी सागीतले . 
  तरी शिरुर कासार तालुकयातील सर्व स्तरातील नागरीकासह सर्व शेतकरी बाधवानी दिनाक १६ फेब्रुवारी २०२६ सोमवारी सकाळी १०:३० वाजता शिरुर कासार येथे बोबा ठोक अदोलनात जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आसे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिरुर कासार तालुका प्रमुख सोपान (काका) मोरे/ उपजिल्हाप्रमुख अजिनाथ (भाऊ) खेडकर यानी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितले असुन महावितरणाचा हा लुटारु कारभार जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत हा संघर्ष चालुच राहणार असल्याचा इशाराही देणयात आला .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी