महा पशुधन एक्सपो मध्ये उमेद अभियानातील महिला स्वयंसहायता गटांना बँक अर्थसहाय्य व अनुदानाचा प्रथम हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित

महा पशुधन एक्सपो मध्ये उमेद अभियानातील महिला स्वयंसहायता गटांना बँक अर्थसहाय्य व अनुदानाचा प्रथम हप्ता मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित
उमेद च्या माध्यमातून अनेक महिला स्वतःच्या पायावर उभे आहेत - मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे
पत्रकार ( परळी /बीड )
 परळी वैजनाथ येथे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 ते दिनांक 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आयोजित महा पशुधन एक्सपो चे आयोजन करण्यात आलेले असून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत स्थापन झालेले महाराष्ट्र राज्यातील व बीड जिल्ह्यातील 68 महिला स्वयंसहायता गटांनी सहभाग घेतलेला आहे.
 यामध्ये आपल्या उत्पादित मालाचे विविध वस्तूंची विक्री करत असताना मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे व मा. श्री विवेक जॉन्सन जिल्हाधिकारी बीड, मा. श्रीमती संगीतादेवी पाटील प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बीड, मा. श्री शकील शेख जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद बीड यांनी सर्व स्टॉलची प्रत्यक्ष पाहणी करून उत्पादित वस्तूंचे व सहभागी महिलांचे भरभरून कौतुक केलेले आहे उत्कृष्ट दर्जाचे वस्तू उत्पादन या ठिकाणी स्वतः बघितलेले आहेत तसेच उसाच्या रसापासून तयार केलेले कुल्फीचा आस्वाद ना. पंकजाताईं मुंडे यांनी घेतला. लाकडी शोभेच्या वस्तूचे विशेष आकर्षण प्रदर्शनामध्ये दिसून आले. घोंगडी, शोभेच्या वस्तू, फुलहार विविध खाद्य पदार्थांचे पण आकर्षण वाटले. प्रदर्शन पहायला आलेल्या नागरिकांनी प्रचंड गर्दी करून प्रत्येक स्टॉल मधील वस्तूंची खरेदी केली. सर्वात जास्त विक्री रसाच्या कुल्फीची आणि लाकडी गाड्यांची व शोभेच्या वस्तूंची झालेली आहे.तसेच विविध 10 स्वयं सहाय्यता समूहानी चहा, फराळ, नाष्टा, दही धपाटे, बाजरीची भाकरी भरीत, पिठलं, वडापाव, भेळ, पाणीपुरी, चाट, सलाड इ. चविष्ट रुचकर व स्वादिष्ट खाद्य पदार्थाची मोठया प्रमाणात विक्री केली. प्रदर्शन पाहायला आलेल्या महिला विद्यार्थी व नागरिकांनी खूप मोठया प्रमाणात प्रतिसाद खाद्य पदार्थांच्या स्टॉलला दिलेला दिसून आला.
 दिनांक 14 फेब्रुवारी रोजी माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व मा. ना. श्रीमती पंकजाताई मुंडे, मा. आ. श्री धनंजय मुंडे, मा. आ. रत्नाकर गुट्टे,सचिव पशुसंवर्धन विभाग यांच्या हस्ते तुळजाई महिला स्वयंसहायता गट जिरेवाडी तालुका बीड जिल्हा परळी या गटाला पंधरा लाख रुपये बँक अर्थ साह्य दुग्ध व्यवसाय व शेळी पालन साठी देऊन गटातील पदाधिकारी यांचा सन्मान केलेला आहे तसेच उमेद अभियानाच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत सखी महिला शेतकरी उत्पादक कंपनी बर्दापुर तालुका आंबेजोगाई जिल्हा बीड यांना शासनाचा प्रथम हप्ता 12 लाख 27 हजार पाचशे रुपये देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील सर्व गटांचे मा. ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये भरभरून कौतुक केले तसेच प्रतिनिधी यांचे सुद्धा भरभरून कौतुक करून गटातील महिला आज स्वतःच्या पायावर उभे राहून उत्पादित मालाची विक्री करताना खूप आनंद व्यक्त केलेला आहे.उमेदचे जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष व सर्व 11 तालुक्यातील तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील सर्व अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत....
 महा पशुधन एक्सपो मध्ये उमेद च्या महिलां स्वयंसहाय्यता गटांनी स्वतः उत्पादित केलेले लाकडी बैलगाडी, खेळणी वस्तूंचे विशेष आकर्षण प्रदर्शनामध्ये आहे, गर्मीमध्ये थंड कुल्फीला नागरिकांनी प्रचंड प्राधान्य दिलेले आहे.गायीच्या शेणा पासून तयार केलेल्या अगरबत्ती,कांद्यापासून तयार केलेले साबण, पपई पासून तयार केलेले साबण,पेरूची वडी चे वेगळेपण दिसून आलेले आहे, इलेक्ट्रिक झुंबर व शोभेच्या वस्तू, बंजारा ड्रेस व विविध वस्तू, मेंढीच्या केसापासून तयार केलेली घोगळी, ईश्वरफुल कोरडे करून तयार केलेले फुलहार, विविध मसाले,मध, पापड सह खाद्यपदार्थ च्या रुचकर चवीसाठी नागरिकांचे प्रचंड प्रतिसाद प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी