टाकळी मानूर येथील संत वामनभाऊ इंग्लिश मेडीयम स्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न
बीड प्रतिनिधी :- दिनांक दहा फेब्रुवारी 2026 रोजी संत वामन भाऊ इंग्लिश मीडियम स्कूल टाकळी मानूर येथे विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले.या शाळेमध्ये प्रत्येक राष्ट्रीय सण सांस्कृतिक सण व विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आणि संस्कृतीची व कलेची ओढ निर्माण व्हावी व विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात चौकोनी चिरा निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून सततच योग्य कार्यक्रम राबवले जातात. अशाच प्रकारच्या काल दिनांक दहा फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक, खेळ क्रीडा आणि विविध स्पर्धामध्ये भाग घेतला होता. या दिवशी 26 जानेवारी दरम्यानच्या विविध खेळ,निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा, खुर्ची चमचालिंबू रेस, सुई धागा व धावणे,कबड्डी, खो-खो व इतर खेळातील आणि स्पर्धेतील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र आणि शालेय साहित्य वाटप करून सत्कार करण्यात आला. या स्नेहसंमेलन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून टाकळीमानुर येथील भवानी माता विद्यामंदिर कॉलेजचे प्राचार्य सोनटक्के सर व इतर त्यांचे सहकारी शिक्षक, अनेक पालक, गावातील प्रतिष्टीत नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता दराडे मॅडम यांच्या हस्ते झाले, कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक आणि सामाजिक राजकीय व इतर क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिमरन मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता दराडे मॅडम यांनी कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्यांचे, पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले, यावेळी बहुसंख्येने पालक वर्ग उपस्थित होता. प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी कलेचा वेगवेगळ्या प्रकार सादर केला, कोणी डान्स, कोणी एकपात्री नाटक, कोणी लावणी तर कोणी समाज प्रबोधन पर गीते सादर केली देशभक्तीपर गीतही सादर करण्यात आले, नर्सरी एलकेजी आणि युकेजी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे छोटे छोटे मुलांचे कलाप्रकार सादर केले, मनमोहक आणि सुदंर कलाप्रकारांणी कार्यक्रमाला शोभा आली यावेळी अनेकांनी बक्षीसही दिले.विविध प्रकारची गाण्याला साजेशे पोशाख आणि वस्तू सोबत घेऊन सामाजिक संदेश देऊन संत वामनभाऊ इंग्लिश मीडियम स्कूलने सांस्कृतिक, कला आणि खेळ प्रेम दाखवून दिले याबद्दल सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीन दादा वंजारे खालापूरीकर यांनी शाळेचे आभार मानले.
Comments
Post a Comment