पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करा अन्यथा तीव्र आंदोलन करू :- पप्पु गायकवाड
पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कार्यवाही करा अन्यथा तीव्र आंदोलन करू :- पप्पु गायकवाड
नगरपरिषद हद्दीत नसलेल्या जागेला अकृषी दाखवत खरेदी-विक्री, खाजगी दलाला मार्फत कर्जहि मंजुर
दुय्यम निबंधक, नगर रचनाकार, ग्रामसेवक, तलाठी, खाजगी व राष्ट्रीयकृत बँक अधिकारी आणि त्यांचे खाजगी दलालांचा अजब कारभार.
गेवराई (प्रतिनिधी) दि. ९ गेवराईच्या दुय्यम निबंधक कार्यालयात सावळा गोंधळ सुरु असून गोरगरीब लोक हवे तेवढे पैसे देत नसल्यास त्यांना खेट्या माराव्या लावुन शारिरीक व मानसिक आर्थिक छळ करून पिळवणूक करत आहेत तर निवडक खाजगी दलालांमार्फत आलेल्या खोट्या दस्ताला खरे ठरवत शासनाचा कोट्यावधी रुपयाचा मुद्रांक शुल्क डुबविन्याचे काम दुय्यम निबंधक, गेवराई तहसिलचे नगर रचनाकार, तलाठी व ईतर काही कर्मचारी करत आहेत त्यांची समिती मार्फत चौकशी करून त्यांच्याविरोधात कठोर कार्यवाही करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी लोकशाही मार्गाने मा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर तिव्र स्वरूपाचे अंदोलन करु असा ईशारा लेखी तक्रार निवेदनाद्वारे गेवराई तालुका अध्यक्ष अजयकुमार (पप्पु)गायकवाड यांनी दिला आहे.
सविस्तर वृत्त असे की दुय्यम निबंधक कार्यालयात अनेक वर्षांपासून दस्त लेखक काही दलालांमार्फत बोगस दस्त तयार करुन शासनाचा करोडो रुपयांचा महसूल डुबावत आहेत. अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतर काही पुरावे हाती लागले आहेत त्यातील खरेदीखत दस्त क्र. ६७३५/२०२५ व ३७३५/२०२५ च्या सत्य प्रती दुय्यम निबंधक कार्यालयातून प्राप्त करुन त्याबद्दल माहिती काढली असता सदरचे दस्त हे मौजे गेवराई येथील सर्वे नं. ७९ मधील असून, सदरची मालमत्ता हि गेवराई नगरपरीषदेच्या हद्दीतील नसतांना नगरपरिषद हद्दीत दाखवले आहे. सदरच्या सर्वे नं. ७९ ला मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून गुंठेवारी प्रमाणपत्र नसतांना तहसिलचे नगर रचनाकार कार्यालयाने बोगस अकृषी प्रमाणपत्र दाखवत नगर रचनाकारचे ले ऑउट नसतांना सदरचे दस्त नोंदणी केली आहे.
तसेच नगरपरिषद हद्दीतील जागेचे मुल्यांकन जास्तीचे असतांना कमी मुल्यांकन दाखवत शासनाचा कोट्यावधी रुपयांचा मुद्रामक शुल्क बुडवत शासनाची देखील फसवनुक केली आहे. गेवराईचे दुय्यम निबंधक कार्यालयाने
सन २०२३ ते २०२५ या कालावधीत बनावट दस्त नोंदणी करून असाच गैरप्रकार करुन शासनाचा मुद्रांक शुल्क बुडवुन शासनाची अर्थीक फसवणूक केल्याप्रकरणी दुय्यम निबंधक यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच सदरचे बोगस दस्ता अधारे खरेदीखत, बक्षिसपत्र,गहाणखत, ७/१२,पिटीआर व सबंधित व्यक्ती हजर नसतांना त्यांच्या बनावट सह्या करून इंडिया फायनान्स कार्पोरेशन लिमेटेड या कंपनीने बोगस दस्ताच्या अधारे विविध प्रकारचे करोडो रुपयांचे कर्ज मंजूर करत आहे. तसेच अनेक मल्टीस्टेट बँकांसह काही राष्ट्रीयकृत बँका देखील बोगस व बेकायदेशीर दस्ताऐवजांवर खाजगी दलालांमार्फत शाखा व्यवस्थापक अर्थीक देवाणघेवाण करुन कर्ज प्रकरणे मंजूर करत आहेत. सदरचे बोगस दस्त नोंदणीसाठी तहसिल, नगरपरिषद, दुय्यम निबंधक व कार्यालयातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत, तलाठी, खाजगी व राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी संगणमताने पदाचा गैरवापर करत खाजगी दुकानातुन अनेक बनावट शिक्के तयार करुन घेतात आणि शासनाचा करोडो रुपयांचा मुद्रांक शुल्क व महसूल बुडवून शासनाची अर्थीक फसवणूक करत आहेत.
गोरगरीब जनतेने अवाजवी पैसे न दिल्यास त्यांची दस्त नोंदणी केली जात नसल्याने नागरीकांना शारिरीक व मानसिक आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे तर काही खाजगी दलालांमार्फत अर्थीक देवाणघेवाण करुन शासनाचा मुद्रांक शुल्क बुडवुन शासनाची सर्रास अर्थीक फसवणूक केली जात आहे तरी सदरच्या प्रकरणाची उच्चस्तरीय समीती स्थापन करुन चौकशी करून सबंधित दोशिंवर कठोर कार्यवाही करावी अन्यथा १५ दिवसा नंतर मा. जिल्हाधिकारी कार्यालया समोर लोकशाही मार्गाने वंचित बहुजन आघाडी तिव्र स्वरूपाचे अंदोलन करेल असा ईशारा मा. जिल्हाधिकारी बीड यांना वंचित बहुजन आघाडी चे गेवराई तालुका अध्यक्ष अजयकुमार (पप्पु) गायकवाड यांच्या स्वाक्षरीच्या तक्रार निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
Comments
Post a Comment