बीडमध्ये माता रमाई यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी होणार - महालिंग निकाळजे

त्याग, समता आणि करुणेचा जागर 


 बीडमध्ये माता रमाई यांची १२७ वी जयंती उत्साहात साजरी होणार - महालिंग निकाळजे 
बीड / प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी बीड शहरात अत्यंत आनंदात, भक्तिभावाने व हर्ष-उल्हासात साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने सकाळी ठीक ८.०० वाजता भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा कार्यालय येथे त्रिसरण-पंचशील घेण्यात येणार असून, त्यानंतर भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ही धम्म रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन बशीरगंज, बलभीम चौक, माळीवेस मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहोचणार आहे. तेथे समता सैनिक दलाच्या मानवंदनेने व अभिवादनाने रॅलीची सांगता होणार आहे.
यानंतर जिल्हा कार्यालयात आयु. वामनराव निकाळजे यांचे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी, महिला जिल्हा व तालुका कार्यकारिणी, केंद्रीय शिक्षक-शिक्षिका, समता सैनिक दल, शाक्य संघ, निवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. बीड शहरातील सुजाण नागरिक, बालक-बालिका, युवक-युवती, बौद्धाचार्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आयु. महालिंग निकाळजे यांनी केले आहे.
त्याग, संघर्ष आणि समतेचा आदर्श घालून देणाऱ्या माता रमाई यांच्या विचारांचा जागर करणारा हा सोहळा बीडच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात नवी प्रेरणा देणारा ठरणार आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी