राज्य पोलिसिंग परिषदेत गोव्यातील अंतर्गत सुरक्षेला भक्कम चालना

राज्य पोलिसिंग परिषदेत गोव्यातील अंतर्गत सुरक्षेला भक्कम चालना

“अंतर्गत सुरक्षा मजबूत करणे ही राज्याची मूलभूत जबाबदारी” – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
पणजी, ३ फेब्रुवारी २०२६ : गोव्यातील पोलिसिंग व अंतर्गत सुरक्षेबाबतची राज्यस्तरीय परिषद पणजी येथे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत पार पडली. गोवा पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच संबंधित विभागांतील हितधारकांनी अंतर्गत सुरक्षा, सार्वजनिक सुरक्षितता आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत सखोल चर्चा केली.

या परिषदेदरम्यान डिचोली पोलीस ठाण्यास देशातील पाचव्या क्रमांकाचे सर्वोत्तम पोलीस ठाणे तसेच गोव्यातील सर्वोत्तम पोलीस ठाणे म्हणून गौरविण्यात आले असून त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. परिषदेत PRISM या केंद्रीकृत गुप्तचर समन्वय प्रणालीवर विशेष भर देण्यात आला, ज्यामुळे गुप्तचर-आधारित पोलिसिंग अधिक प्रभावी होणार आहे. तसेच सायबर आर्थिक फसवणूक प्रकरणांमध्ये तक्रार नोंदणी व तत्काळ प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी e-Zero FIR या नागरिक-केंद्रित उपक्रमाचाही आढावा घेण्यात आला.

समारोप सत्रात बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, सायबर गुन्हे, अमली पदार्थांची तस्करी, रस्ते सुरक्षा, किनारी सुरक्षा आणि पर्यटन सुरक्षितता यांसारख्या उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाताना राज्य व्यावसायिक, तंत्रज्ञानाधारित आणि नागरिक-केंद्रित पोलिसिंगसाठी कटिबद्ध आहे. समन्वयात्मक कारवाई, मजबूत अभियोजन व्यवस्था, समाजाचा सहभाग आणि डिजिटल परिवर्तन हे सार्वजनिक सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाचे घटक असून राज्याचे प्रयत्न ‘विकसित गोवा, विकसित भारत’ या राष्ट्रीय दृष्टिकोनाशी सुसंगत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या परिषदेला मुख्य सचिव सी. कांडावेलू, पोलीस महासंचालक आलोक कुमार, विविध विभागांचे पोलीस अधीक्षक तसेच विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी