महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ४५/११ आष्टी शाखेची स्थापना
आष्टी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ४५/११ शाखा आष्टीची स्थापना जिल्हा सचिव अमोल तुपे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात करण्यात आली. या प्रसंगी आष्टी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत संघटनेच्या आष्टी तालुका कार्यकारिणीची निवड सर्वानुमते करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी दत्तू देसाई, तालुका सचिवपदी संजय काकडे, तालुका उपाध्यक्षपदी वैभव खिळे व विकास शिरसागर यांची निवड करण्यात आली.
तसेच संघटनेच्या सदस्य म्हणून राहुल साबळे, महेश जठार, ऋषिकेश शेळके, राजेंद्र खिळे, नाना पवार, शंकर झुनगुरे, हारी शेलार, समीर सय्यद व अनिल पांडुळे यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी जिल्हा सचिव अमोल तुपे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या, सेवा सुरक्षा, वेतनवाढ, पदोन्नती व कर्मचारी हक्कांबाबत मार्गदर्शन केले. संघटनेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकसंघपणे लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी संघटनेची ध्येयधोरणे तळागाळातील कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपस्थित सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. आष्टी तालुक्यात संघटनेच्या स्थापनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment