माता रमाईच्या त्यागामुळेच आपण सर्व भारतीय ऐशो अरामात जिवन जगत आहेत :- पप्पु गायकवाड

माता रमाईच्या त्यागामुळेच आपण सर्व भारतीय ऐशो अरामात जिवन जगत आहेत :- पप्पु गायकवाड 

निपाणी जवळका येथे माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. 
गेवराई (प्रतिनिधी) दि. ७ तालुक्यातील मौजे निपाणी जवळका येथे त्यागमुर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी. 
 यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले माता रमाई यांनी कोणताच थाटमाट न करता मुंबई सारख्या शहरात शेणाच्या गौऱ्या थापून विकल्या आणि त्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह तर भागवलाच त्यातीलच काही पैशांची बचत करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विदेशात शिक्षण घेत असतांना त्यांनाही पैसे देत त्यामुळे बाबासाहेब उच्च शिक्षण घेवु शकले आणि त्यांनी आपल्या समस्त भारतियांसाठी अजरामर असे संविधानरुपी राज्यघटणा दिली म्हणून आपण आज ऐशो अरामात राहत आहोत ते फक्त त्यागमुर्ती माता रमाई यांनी केलेल्या त्यागामुळेच असे मत जयंतीच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अजयकुमार(पप्पु)गायकवाड यांनी व्यक्त केले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष अनिल बोराडे, तालुका सरचिटणीस सुभाष बांगर, समता सैनिक म्हणून नवनाथ रावजी त्रिभुवन, शांताराम बांगर, बाबासाहेब बांगर, बाजीराव बांगर, बबलू बांगर, सुचित बांगर, सचिन बांगर त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा निपाणी जवळका सर्व पदाधिकारी कार्यक्रमास हजर होते तसेच 
शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ हजर होते या कार्यक्रमास प्रामुख्याने महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी