चापडगाव जिल्हा परिषद शाळेत बाल आनंदी बाजार उत्साहात
चापडगाव जिल्हा परिषद शाळेत बाल आनंदी बाजार उत्साहात
३२ हजाराच्या वर उलाढाल
शेवगाव तालुक्यातील चापडगाव जिल्हा परिषद शाळेत बालआनंदी बाजाराचे उद्घाटन जेष्ठ नागरिक ह .भ.प हिमतराव गोरे महाराज यांनी चापडगावचे सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक , ग्रामपंचायत सदस्य व सर्व कर्मचारी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्याक्ष व सर्व सदस्य , चेअरमन , व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ ,
पोलीस पाटील व मान्यवर प्रतिष्ठित ग्रामस्थ , पालक महिला भगिनी कॉलेज युवक युवती आदि बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत फित कापून केले.
प्रारंभी चापडगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री तुकाराम भगत यांनी आनंदी बाजाराचे महत्त्व आपल्या उद्घाटनपर मनोगतातून व्यक्त केले. विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आदि गणिती क्रियां बरोबरच वजन मापे ,दुर्मिळ पदार्थ , भाज्यांची ओळख व गणितीय संबोध पक्के होण्यासाठी आनंदी बाजार एक महत्वाचा दुवा असल्याने सर्व शिक्षक वृंदाच्या अथक परिश्रमांतून बाल आनंदी बाजारचे नियोजन करण्यात आल्याचे नमुद केले.
भाजीपाला विक्री केंद्राचे व्यवस्थापन जेष्ठ शिक्षक दादासाहेब चव्हाण सर व बाबासाहेब हरदास सर यांनी अत्यंत सुबक पद्धतीने केले . येणारा प्रत्येक चिमुकला शेतकरी आखलेल्या पट्टयात बसूनच स्टॉलची शिस्तबद्ध मांडणी करीत होता. भाजीपाला विभागात तंबाटे वांगे मिरची बटाटे कोथंबीर कांदे कांदेपात चंदनबटवा मेथी पालक कढीपत्ता टहाळ मुळा गाजर मोडाची मटकी बटाटे आद्रक शेवगा लसूण डिंगऱ्या जवस हरभरा तीळ आदि स्टॉलची नोंदणी झाली .
स्टेशनरी विभागाचे व्यवस्थापन श्री रवींद्र घनवट सर व कारभारी नाचन सर यांनी आकर्षक मांडणीने केले या विभागात पेन पेन्सिल खोडरबर वही झाडू खराटे गंध साबण कुलूप पिशव्या मॅगी मूगदाळ शेंगादाणे आदि प्रकारच्या स्टॉलची नोंदणी झाली .
खाऊ गल्ली विभागाचे व्यवस्थापन श्रीमती मंजुश्री खंडागळे मॅडम , नंदाताई निकाळजे , शोभाताई मडके यांनी केले खाऊ गल्ली विभागात पोहे पापड मसाले मिरची पावडर लसूण शेव मेथी पावडर शेवगा पावडर भेळ पाणीपुरी वडापाव सामोसे भजेपाव तीळ लाडू उसळ मसाला गुलाब जामून कचोरी पुरीभाजी शाबुदाणा वडा गुळ धपाटे पॅटीस इडली सांबर नाचणी पापड्या तांदूळ पापड लिंबू सरबत पाणी बॉटल आदि पदार्थाची मांडणी अर्धगोलाकार रचनेत अत्यंत आकर्षक केली होती . खाद्य पदार्थ व भाजीपाला यापासून निर्माण होणारा कचरा टाकण्यासाठी फिरत्या कचरा कुंडीची व्यवस्था करण्यात आली होती .
बाल चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विक्री बरोबरच खरेदीचाही आनंद लुटला . खाऊगल्ली भरपूर घरगुती खाद्यपदार्थांनी नटली होती . बालकांनी मात्यापित्यांच्या सहकार्याने हट्ट धरून विक्रीसाठी विविध पदार्थ आणले होते . मान्यवर ग्रामस्थांनीही बाजारात आणलेल्या रुचकर पदार्थांची खरेदी करून मनसोक्त आस्वाद घेतला.
भाजीपाला विभागात ६२ स्टॉल्स खाऊ गल्ली विभागात ३२ स्टॉल्स तर स्टेशनरी विभागात ९ स्टॉल्स अशा एकूण १०३ स्टॉल्सची नोंदणी झाली . सुमारे दोन ते अडीच तास चाललेल्या या बालआनंदी बाजारात सुमारे ३२ हजार २७८ रुपयांची अभूतपूर्व उलाढाल झाली . बालचिमुकल्यांनी विक्रीसाठी भाजी घ्या भाजी पुरीभाजी घ्या पुरीभाजी तंबाटे घ्या तंबाटे कोथंबीर घ्या कोथंबीर भेळ घ्या भेळ वडापाव घ्या वडापाव लिंबू घ्या लिंबू सरबत घ्या सरबत आदि अबलंबिलेली पद्धत उपस्थित व खरेदी साठी आलेल्या सर्वच मान्यवरांना भावली. या उपक्रमाबद्दल सर्वच शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले .
आनंदी बाजारदरम्यान माध्यामिक शिक्षक झरेकर सर व तहकिक सर यांच्यासह ग्रामस्थांनी चिमुकल्या व्यापाऱ्यांना नाणी नोटा बेरीज वजाबाकी वजन मापे नफा तोटा विक्रीसाठी मांडलेल्या वस्तूंचे उपयोग याविषयीचे प्रश्न विचारले असता मुलांनी आनंदाने समर्पक उत्तरे देऊन अचंबित केले . यातून विद्यार्थ्यांनी व्यवहारीक ज्ञान प्राप्त केले . प्रातिनिधिक स्वरूपात तीर्थराज विठ्ठल भिसे व श्रुतिका बाजीराव पातकळ यांनी खुमासदार मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचा समारोप शिक्षक कवी गवाजी बळीद यांनी "मळ्यात होत ते शाळेत आणलं, घरात बनवून बाजारी मांडलं शेजारच्या त्या चंदा काकू आल्यात बाजारला
जवा बोबडे गण्या हा लागला नोटाच मोजायला
या गीताने करून सर्वांना आनंदी करून जिंकले .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केंद्रप्रमुख बबनराव ढाकणेसर बोधगाव बीटचे विस्तार अधिकारी डॉ शंकर गाडेकर गट शिक्षणाधिकारी श्रीम शैलजा राऊळ मॅडम गटविकास अधिकारी सोनल शहा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले .
शब्दांकन : कवी गवाजी बी बळीद
चापडगाव
Comments
Post a Comment