डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी जिल्हाध्यक्षांना केले आवाहन.

डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी जिल्हाध्यक्षांना केले आवाहन.


मुंबई /प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या वसंतराव काणे आर्दश तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आर्दश जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यातील तालुका अध्यक्षांचा मेळावा येत्या 22 फेब्रुवारी 2026 रोजी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस.एम.देशमुख यांच्या अध्यतेखाली होत असुन या अभुतपूर्व सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मीडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्ष यांनी आप आपल्या जिल्हयाच्या ठिकाणी एक व्यापक बैठक घेऊन सर्वांना निमंत्रीत करावे. व सर्वांना सोबत घेऊन या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे. असे आवाहन डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने प्रत्येक वर्षी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त माननीय श्री.एस.एम.देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा आणि राज्यातील तालुका अध्यक्ष यांचा मेळावा घेतला जातो. यावर्षी देखील रायगड जिल्ह्यातील कर्जत या तालुक्याच्या ठिकाणी येत्या रविवारी 22 फेब्रुवारी 2026 रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आदर्श तालुका पत्रकार संघ,आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व राज्यातील तालुका अध्यक्ष यांचा मेळावा या
संदर्भात महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या जिल्ह्यातील डिजिटल मीडिया परिषदेच्या सर्व तालुका अध्यक्षांना एकत्रित करावे. त्याचबरोबर त्यांची जिल्हा स्तरावर तातडीने एक व्यापक बैठक घेऊन या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी नियोजन करावे.अशा प्रकारचे आवाहन डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना केले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी