महाशिवरात्री निमित्त श्रीक्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी



लिंबागणेश:- (दि.१५) बीड तालुक्यातील बालाघाटावरील लिंबागणेश पंचक्रोशीतील बेलगाव येथील श्रीक्षेत्र बेलेश्वर मंदिर येथे आज महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात तसेच दर्शन मंडप आणि परिसरात फुलांच्या माळांनी आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

संस्थानचे मठाधिपती महंत महादेव भारती महाराज तसेच शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांचे भाविकांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.

मंदिर रोडवर विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटली असून भाविकांसाठी साबुदाणा खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले. यात्रेनिमित्त पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून लिंबागणेश पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड, गणेश परझने तसेच होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

महाशिवरात्री निमित्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि.१६ सोमवार रोजी शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाने सप्ताहाची सांगता होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेलेश्वर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी