सामाजिक कार्यकर्त्या नयना भाकरे यांचा वाढदिवस जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात साजरा

सामाजिक कार्यकर्त्या नयना भाकरे यांचा वाढदिवस जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात साजरा
​बीड (प्रतिनिधी): सामाजिक कार्यकर्त्या नयना भाकरे यांनी आपला वाढदिवस समाजातील उपेक्षित घटकांसोबत साजरा करत एक स्तुत्य पायंडा पाडला आहे. बीड येथील जिव्हाळा बेघर निवारा केंद्रात बेघर बांधवांसोबत त्यांनी हा आनंद साजरा केला. वाढदिवसाचे औचित्य आणि महाशिवरात्रीचा योगायोग साधत, निवारा केंद्रातील सर्व बेघर व्यक्तींना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमावेळी नगरसेवक मनोज गोडसे, मनीषा कादे, आशाताई ढोले, सुरेखा जाधव, वंदना देशमुख, शिवकन्या घिगे यांच्यासह ईनकर दांपत्य उपस्थित होते. प्रगती, व्यंकटेश, आराध्या, अनुष्का, अभिनंदन, मयुरी आणि निवारा केंद्रातील सर्व सदस्यांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला.
​केवळ हार-तुरे किंवा अनावश्यक खर्च टाळून गरजूंच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी