महिलांच्या खुल्या गीत गायन कराओके स्पर्धेचे बीडमध्ये आयोजन


बीड । प्रतिनिधी
बीड शहरातील कलाकार ग्रुप यांच्या वतीने महिलांसाठी खुल्या गीत गायन कराओके स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी बाबासाहेब आंबेडकर भवन, हॉल, नगर रोड, बीड येथे दुपारी 12.00 ते सायं. 5.00 या वेळेत संपन्न होणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देण्यात येणार आहेत. प्रथम पारितोषिक: रु. 5000/- व सन्मानचिन्ह (आर्यन ट्रेडर्सचे प्रो. प्रा. अमोल बागलाने यांच्या वतीने),द्वितीय पारितोषिक: रु. 3000/- व सन्मानचिन्ह (रोख, अथर उर्फ बब्बु यांच्या वतीने), तृतीय पारितोषिक: रु. 2000/- व सन्मानचिन्ह (श्री. बबनराव वडमारे यांच्या वतीने) उत्तेजनार्थ पारितोषिके: प्रत्येकी रु. 1000/- व सन्मानचिन्ह (एकूण 3 पारितोषिके) - श्री. राजाभाऊ गुजर, नगरसेवक,बीड यांच्या वतीने स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या इच्छुक महिलांनी आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 13 फेब्रुवारी 2026 रोजी सायं. 5.00 वाजेपर्यंत प्रवेश शुल्क रु. 500/- संयोजक अ‍ॅड. अविनाश गडगे (मो. नं. 9422244510) यांच्याकडे ऑनलाईन जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे संयोजक श्री. बबनराव वडमारे, श्री. मॅथ्यु जोसफ, श्री. विराज प्रकाश, श्री. कैलास थोरात, नइम इनामंदार, डॉ. सुधिर साळवी व श्री. जनार्धन वडमारे यांनी अधिकाधिक महिलांनी सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन केले आहे. स्पर्धा समाप्तीनंतर त्याच ठिकाणी त्वरित बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी