अनेक वर्षांपासून दसऱ्याला मिळणारा आशीर्वाद आज हरपला-माजी मंत्री धनंजय मुंडे
अनेक वर्षांपासून दसऱ्याला मिळणारा आशीर्वाद आज हरपला-माजी मंत्री धनंजय मुंडे
जगतकर परिवाराचे मुंडे यांच्याकडून सांत्वन
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
जगतकर कुटुंबीयांना सांत्वन भेट देण्यासाठी आलेले माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी भावूक होताना वरील उद्गार काढले. आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची परंपरा आमदार मुंडे यांनी अनेक वर्षांपासून जपली आहे.
वैद्यनाथ बँकेचे संचालक तसेच महिला महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. विनोद जगतकर यांच्या मातोश्रींचे मंगळवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी दुःखद निधन झाले होते. आपल्या अत्यंत निकटवर्तीय सहकारी मित्राच्या दुःखात धीर देण्यासाठी आमदार मुंडे यांनी आज जगतकर कुटुंबीयांची भेट घेतली.
दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी जगतकर कुटुंबीयांच्या घरी भेट दिल्यानंतर ते मातोश्रींचे आवर्जून दर्शन घेत असत. आज त्या आठवणीने ते विशेष भावूक झाले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांसह सर्व नातेवाईक व आप्तेष्टांचीही आवर्जून भेट घेत सांत्वन केले.
Comments
Post a Comment