दलितांना पोट भरण्यासाठी दिलेल्या गायरानात विशिष्ट व्यक्तींना लाभ देण्यासाठी रस्ता मंजूर
दलितांना पोट भरण्यासाठी दिलेल्या गायरानात विशिष्ट व्यक्तींना लाभ देण्यासाठी रस्ता मंजूर-लोक जनशक्ती पार्टी युवा (र)
अंबाजोगाई : अंबाजोगाई गटविकास अधिकारी यांना अंधारात ठेवून मोजे मुरंबी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथे असलेल्या गायरानामध्ये काही धनदांगड्या व्यक्तींनी रस्ता बनवण्याचा घाट बनवला आहे त्यातच त्यांना प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक यांची सुद्धा मदत असल्याचे दिसून येत आहे ग्रामसेवक यांना लोक जनशक्ती पार्टी च्या कार्यकर्त्यांनी हा रस्ता कोणत्या विभागा मार्फत मंजूर करण्यात आला आहे अशी विचारणा केली असता हा रस्ता शिव रस्ता आहे असा अजब युक्तिवाद ग्रामसेवकांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले परंतु गायरानात शिवरस्ता हा नसतो हे बहुदा ग्रामसेवकांना माहीत नसावे विशेष करून या गायरानाच्या मधोमध जवळपास अर्धा किलोमीटर काही श्रीमंत व्यक्तींच्या जमिनी असल्यामुळे या जमिनीला फायदा पोहोचवण्यासाठी दलित समाजाला मिळालेल्या गायरानाच्या मध्य भागामधून हा रस्ता करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे विशेष करून या रस्त्याचे टेंडर कधी निघाले टेंडर कधी मंजूर झाले आणि ते टेंडर किंवा हा रस्ता कोण करत आहे हे सुद्धा गावकऱ्यांना माहीत नसल्यामुळे या कामा संदर्भात शंका निर्माण होत आहे त्यामुळे त्या कामाची तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आले व संबंधित प्रकरणात जर कारवाई केली नाही तर लवकरच आगळे वेगळे आंदोलन करून प्रशासनाचा निषेध केला जाईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे चे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी लोकजनशक्ती पार्टी (र) युवा मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे बीड जिल्हा अध्यक्ष अशोक काळे लोक जनशक्ती पार्टीचे परळी विधानसभा तालुका अध्यक्ष विशाल भैया शेवाळे केज तालुका अध्यक्ष गंगाधर पोळ प्रदीप गुंड्रे दिनेश घार आदित्य भैया चौरे व इतर
Comments
Post a Comment