पत्रकारितेला समाजसेवेची दिशा देणारे, वंचितांचा आधार आणि पीडितांचा आवाज : प्रा. बालाजी जगतकर
शब्दांना धार आणि विचारांना ठामपणा असलेले, अन्यायाविरोधात नेहमीच उभे राहणारे आणि सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बनलेले डॅशींग पत्रकार प्रा. बालाजी जगतकर आज आपल्या आयुष्याचा आणखी एक सुवर्णक्षण साजरे करत आहेत. त्यांच्या लेखणीतून केवळ बातम्या नाहीत, तर समाजबदलाची चळवळ उभी राहते. अशा या निर्भीड, संवेदनशील आणि समाजभान असलेल्या पत्रकाराला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रा. बालाजी जगतकर हे आजच्या पत्रकारितेतील एक वेगळे, ठळक आणि विश्वासार्ह नाव आहे. ते केवळ बातमी देणारे पत्रकार नाहीत, तर समाजातील वंचित, पिडीत आणि दुर्लक्षित घटकांचा खरा आवाज आहेत. त्यांच्या लेखणीमध्ये धार आहे, पण त्याहून अधिक त्यात माणुसकी आहे.
नेहमी हसतमुख, मनमिळाऊ आणि सर्वांशी आपुलकीने वागणारे प्रा. जगतकर हे स्वभावाने जितके साधे आहेत, तितकेच ते विचारांनी ठाम आहेत. सामान्य माणसाचे दुःख, अडचणी, प्रश्न आणि अन्याय त्यांच्या मनाला सतत अस्वस्थ करत असतात. त्यामुळेच ते या प्रश्नांना शब्द देतात, त्यांना दिशा देतात आणि थेट शासनाच्या दालनापर्यंत पोहोचवतात.
एखादी समस्या समोर आली की, ती फक्त छापून थांबणे त्यांना मान्य नसते. तो प्रश्न सुटेपर्यंत, त्यावर निर्णय होईपर्यंत आणि पीडिताला न्याय मिळेपर्यंत त्यांचा पाठपुरावा सुरूच असतो. प्रशासनालाही त्यांच्या लेखणीची दखल घ्यावी लागते, कारण त्यांचे लिखाण केवळ माहिती देत नाही, तर प्रश्न उपस्थित करते आणि उत्तर मागते.राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतील लोकांशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध आहेत. मात्र, जनतेच्या प्रश्नावर ते कधीही तडजोड करत नाहीत. सत्य लिहिताना ते कोणाचीही भीडभाड ठेवत नाहीत. हीच निर्भीडता त्यांना समाजात वेगळी ओळख देते.आज अनेकजण पत्रकार आहेत, पण प्रा. बालाजी जगतकर यांच्यासारखे समाजासाठी झटणारे पत्रकार फारच कमी आहेत. त्यांच्या लेखणीमुळे अनेक सामान्य माणसांना न्याय मिळाला आहे, अनेक प्रश्नांना वाचा फुटली आहे आणि अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण झाला आहे.सर्व जाती-धर्मातील नागरिकांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते प्रत्येकाशी समानतेने, सन्मानाने आणि माणुसकीने वागतात. म्हणूनच समाजातील प्रत्येक स्तरातून त्यांच्याविषयी प्रेम, आदर आणि विश्वास व्यक्त केला जातो.
त्यांच्या कार्यातून हे स्पष्ट होते की, पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून ती समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. सत्यासाठी उभे राहणे, अन्यायाविरोधात आवाज उठवणे आणि पीडितांना न्याय मिळवून देणे — हेच त्यांच्या पत्रकारितेचे खरे स्वरूप आहे. त्यामुळेच ते आज डॅशींग पत्रकार म्हणून ओळखले जातात.आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या लेखणीला अधिक बळ मिळो, त्यांच्या विचारांना अधिक व्यापकता मिळो आणि ते असेच समाजासाठी झटत राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
• गणेश शिंदे •
बीड 8806714987
Comments
Post a Comment