पाटोद्यात पत्रकार दिन उत्साहात साजरा; अंगद सांगळे यांच्या वतीने पत्रकार बांधवांचा लेखणी देऊन सन्मान


पाटोदा (प्रतिनिधी) पाटोदा तालुक्यात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे पाटोदा तालुकाध्यक्ष अजय जोशी हे होते. या कार्यक्रमात आमदार सुरेश धस यांचे मावळे अंगद सांगळे यांच्या वतीने पत्रकार बांधवांचा लेखणी देऊन सन्मान करण्यात आला. लेखणी ही पत्रकाराच्या सत्य, निर्भीड व निःपक्ष पत्रकारितेचे प्रतीक असल्याने या सन्मानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. यावेळी युवा पत्रकार जितेंद्र भोसले यांनी पत्रकारितेच्या मूल्यांवर आपले विचार मांडले. समाजातील अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभे राहणारी, सत्यनिष्ठ आणि जबाबदार पत्रकारिता हीच लोकशाहीचा खरा कणा असल्याचे त्यांनी नमूद केले.अध्यक्षीय भाषणात अजय जोशी यांनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत लोकहितासाठी काम करत राहावे, असे आवाहन केले. कार्यक्रमामुळे पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पत्रकारितेची मूल्ये जपण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाचे आभार पत्रकार जावेद शेख यांनी मानले

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी