महा एनजिओ फेडरेशन आणि लेक लाडकी अभियान यांच्या वतीने मौजे कुक्कडगाव चे भुमिपुत्र यशवंत कदम यांचा सेवापुर्ती निमित्ताने सन्मान



बीड प्रतिनिधी :- बीड तालुक्यातील मौजे कुक्कडगाव चे भुमिपुत्र कृषी उत्पन्न बाजार समिती बीड चे सचिव यशवंत राणाप्रताप कदम पस्तीस वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर शासन सेवेतुन सेवानिवृत्त झाल्याबद्दल महा एनजीओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य आणि लेक लाडकी अभियान यांच्या वतीने सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह ,शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी दैनिक आत्ताचा एक्स्प्रेस जिल्हा प्रतिनिधी किशोर देवा कुलकर्णी, साप्ताहिक संघर्ष यात्रा चे संपादक आत्माराम वाव्हळ, प्रकाश गाढे, पत्रकार संजय कुलकर्णी, कुक्कडगाव ग्रामपंचायत सदस्य आत्माराम प्रभाळे, चंद्रकांत नवले, सोनवणे मॅडम, भागवत वैद्य, तुळशिदास पवार,सुदाम आरेकर, महा एनजीओ फेडरेशन चे बीड जिल्हा समन्वयक श्री बाजीराव ढाकणे यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
       बीड तालुक्यातील मौजे कुक्कडगाव येथील भुमिपुत्र यशवंतराव राणाप्रताप कदम शासकीय सेवेतुन प्रदिर्घ काळानंतर सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार आणि सन्मान महा एनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य आणि लेक लाडकी अभियान,महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केला होता.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी