मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात

मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीड जिल्ह्यात

“सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण”  सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने :- डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि.०९)मराठवाड्यात २०२५ या वर्षात एकूण ११२९ शेतकरी आत्महत्या झाल्या असून, त्यामध्ये बीड जिल्ह्यातील २५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या करत मरणाला कवटाळले आहे. मागील दोन वर्षांपासून बीड जिल्हा मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये आघाडीवर असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

शासन व प्रशासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, “सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण” या घोषणेच्या निषेधार्थ आज शुक्रवार दि. ०९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर " सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण" घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करण्यात आली.
ही निदर्शने सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ (महाराष्ट्र राज्य) डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

यावेळी आंदोलकांनी सरकार व प्रशासनाने केवळ फोटोसेशनपुरते मर्यादित न राहता शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी ठोस व परिणामकारक पावले उचलावीत अशी ठाम मागणी केली. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आले. यावेळी आंदोलनात माजी सैनिक अशोक येडे ( जिल्हाध्यक्ष,आम आदमी पार्टी ,रामधन जमाले (जिल्हाध्यक्ष इंटक), कुलदीप करपे ( जिल्हाध्यक्ष क्रांतिकारी शेतकरी संघटना ) शेतकरी पुत्र राजेंद्र आमटे, सुहास जायभाये , माहिती आधिकार कार्यकर्ते शेख मुबीन , पांडुरंग हराळे , गणेश नाईकवाडे (जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ),प्रा.डी.जी.तांदळे(अध्यक्ष म.रा.किसानसभा जि.बीड, प्रा.राजकुमार यादव, डॉ.संजय तांदळे आदी सहभागी होते.



मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांची मालिका सुरूच असून, त्यामागे कर्जबाजारीपणा, नापिकी, सावकारांचा विळखा, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे, तसेच प्रशासनाची उदासीनता ही प्रमुख कारणे आहेत.
२०२४ मध्ये मराठवाड्यात ९८४ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या, तर २०२५ मध्ये हा आकडा वाढून ११२९ वर पोहोचला आहे.

यावर्षी मराठवाड्यावर आसमानी संकट कोसळल्याने ४० लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसला आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण ठरत असून, प्रशासन व राजकीय पुढाऱ्यांनी निव्वळ दिखाऊ उपाय न करता शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठोस धोरणे तात्काळ राबवावीत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी आंदोलनात विविध सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी