आर पी आय आठवले गटाचे राज्य संघटक खंडूजी मोरे राष्ट्रीय पातळीवरील साई जीवन गौरव समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

आष्टी (प्रतिनिधी-- गोरख मोरे ) : 
             रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडी महाराष्ट्र राज्य संघटक खंडूजी तुकाराम मोरे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन यांना साई जीवन गौरव समाज भूषण पुरस्कार 2026चा  पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले  .
खंडुजी तुकाराम मोरे यांनी महाराष्ट्र राज्यात सामाजिक क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याची  पोहच पावती म्हणून यांना राष्ट्रीय पातळीवर दिला जाणारा साई जीवन गौरव समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ओम साई विकास प्रतिष्ठान व बी सी फिल्म प्रोडक्शन सुदाम संसारे यांच्या हस्ते तसेच चित्रपट देता व सर्व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते रिलस्टार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . 
    आर पी आय आठवले गटाचे राज्य संघटक खंडूजी तुकाराम  मोरे साई जीवन गौरव समाज भूषण पुरस्काराने सन्मानित झाल्याने राजकीय /सामाजिक/ शैक्षणिक /आप्तेष्ट/ मित्र परिवारआदी क्षेत्रातील मान्यवर माता -भगिनी कडून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी