अखेर अजितदादांनी यशवंतराव नाट्यगृहात केलेला वादा निभावला..तब्बल ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी दिला.अजितदादांचे आभार- डॉ.गणेश ढवळे
अखेर अजितदादांनी यशवंतराव नाट्यगृहात केलेला वादा निभावला..तब्बल ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी दिला.अजितदादांचे आभार- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
बीड शहराचे वैभव असणा-या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची कित्येक वर्षांपासून दुर्दशा झाली होती. अभिनेते शरद पोंक्षे सारख्या नाट्यकलावंताने "माफ करा पण पुन्हा या नाट्यगृहात कधीच येणार नाही" म्हणत अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली होती.... बीड शहरातील नाट्य कलावंत , सामाजिक कार्यकर्ते यांनी निवेदने, आंदोलने आणि पाठपुरावा केल्यानंतर अखेर अजितदादा यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच बीडमधील कलावंत आणि रसिकांना सुखद धक्का दिला आहे... दादांचे मनस्वी आभार....
पालकमंत्री अजितदादा पवार यांचे बीडमधील यासाठी पाठपुरावा करणारे सध्याचे बळीआप्पा गवतेंसह सर्वच स्थानिक नेते आणि पुर्वाश्रमीचे योगेश क्षीरसागर यांच्या समवेत असणारे कार्यकर्ते त्याच बरोबर शिवसेनेचे सचिन मुळुक, आनिलदादा जगताप, प्रतिक कांबळे ज्यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांचे आभार...
नाट्यगृह बचाव समितीचे आंदोलन....
दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी नाट्यगृह बचाव समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन केले होते. नाट्यगृहाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता.त्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी १० लक्ष रुपयांचा निधी दुरूस्तीसाठी मंजूर केला होता.
सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन
दि.२४.०२.२०२५ रोजी नाट्यगृह दुरूस्तीसाठी निधीची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर लक्ष्यवेधी आंदोलन केले होते.या आंदोलनात बीडचे ज्येष्ठ नाट्य कलावंत सहभागी झाले होते....
प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची
बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था अनुषंगाने विविध दैनिकात मोठ्या प्रमाणावर शासन आणि प्रशासनाला धारेवर धरत आवाज उठवला होता त्यामुळे यामध्ये प्रसारमाध्यमांचा सिंहाचा वाटा आहे.... कळत नकळत ज्यांनी नाट्यगृहासाठी पाठपुरावा केला त्या सर्वांचेच मनस्वी आभार
Comments
Post a Comment