बीड जिल्ह्याचा इतिहास पोहोचणार घरोघरी जिल्ह्याच्या इतिहासावर प्रज्ञाशोध परीक्षा
बीड जिल्ह्याचा इतिहास पोहोचणार घरोघरी जिल्ह्याच्या इतिहासावर प्रज्ञाशोध परीक्षा
बीड ,(प्रतिनिधी) बीड जिल्ह्याच्या विषयी राज्यभर नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त होत असतानाच बीड जिल्ह्याच्या वैभवशाली इतिहासाचे नव्या पिढीला ज्ञान व्हावे व शालेय विद्यार्थ्यांना बीड जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास कळावा या ध्येयाने आता बीड जिल्हा इतिहास परिषद सरसावली असून परिषदेने शालेय स्तरावर जिल्ह्याच्या इतिहासाच्या प्रचारासाठी बीड जिल्हा इतिहास प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले आहे. या परीक्षा सर्व तालुक्यातून शालेय विद्यार्थ्यांसाठी 'गोष्ट बीड जिल्ह्याच्या इतिहासाची' या बीड इतिहास विषयक पुस्तकावर आधारित होणार असून परीक्षेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हे मौल्यवान पुस्तक विनामूल्य दिले जाणार आहे. परीक्षेला बीड शहरात पहिल्या टप्प्यात प्रचंड प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हा इतिहास परिषदेचे अध्यक्ष सतीश साळुंके यांनी दिली.
या पुस्तक प्रकाशनासाठी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अर्थसाह्य केल्याबद्दल परिषदेने त्यांचे आभार मानले आहेत.
'गोष्ट बीड जिल्ह्याच्या इतिहासाची' या पुस्तकात बीड जिल्ह्याच्या प्राचीन काळापासून ते हैदराबाद स्वातंत्र्यसंग्रापर्यंतचा सूत्रबद्ध इतिहास मांडण्यात आला असून शालेय विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे आगळे वेगळे महत्त्व आणि वैशिष्ट्य म्हणजे बीड जिल्ह्यातील विविध प्राचीन व मध्ययुगीन अशा 14 स्थळांचे व्हिडिओ क्यू आर कोडच्या रूपाने या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. म्हणजे वाचक ज्या स्थळाची माहिती वाचतोय त्या स्थळाचे व्हिडिओ वाचकांना मोबाईलवर स्कॅन करून दिसू शकतील. हा इतिहास लेखनातील अभिनव प्रयोग असल्याचे मत या पुस्तकाचे लेखक डॉ. सतीश साळुंके यांनी सांगितले. या बीड जिल्हा इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा दहावी आठवी ते दहावी व पाचवी ते सातवी अशा दोन गटात होतील दोन्ही गटाला रोख रखमेची बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र दिली जातील. तसेच परीक्षेत बसणारा प्रत्येक विद्यार्थ्याला हे पुस्तक मोफत दिले जाणार आहे. या परीक्षा ४ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून बीड शहरातील पहिल्या टप्प्यात सर्व शाळांमधूनेत परीक्षेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बीडचा इतिहास घरोघरी पोहोचणार आहे. ज्या शाळांना या प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित करायचे आहे त्यांनी डॉ. सतीश साळुंके यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बीड जिल्हा इतिहास परिषदेने केले आहे.
Comments
Post a Comment