मुस्लिम सेवा संघातर्फे बालेपीर व शहेनशाह वली परिसरात गरजू कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप



बीड - प्रतिनिधी:सामाजिक बांधिलकी जपत मुस्लिम सेवा संघाच्या वतीने आज बालेपीर आणि शहेनशाह वली परिसरात गरजू लोकांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळाला असून, संघटनेच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रमुख मार्गदर्शन आणि उपस्थिती लाभली.
हा कार्यक्रम संघटनेचे प्रदेश महासचिव फिरदोस सर आणि शिक्षण व इतर कर्मचारी विभाग राज्य अध्यक्ष मुमताज मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नेटकेपणाने पार पडला. समाजातील वंचितांना मदत पोहोचवण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. यामध्ये प्रामुख्याने पत्रकार शेख फहीम, मान्यवर म्हणून माजी नगरसेवक फारूक मणियार, डॉक्टर वकास खान प्रमुख पदाधिकारी म्हणून रफिक आतार, माजेद खान, नवीद खान, शेख युसूफ, शेख मोहसीन, बब्बर पठाण, रियाज सिद्दिकी तसेच महिला पदाधिकारी म्हणून सुलताना बेगम, शाजिया शेख, शिरीन शेख, नुजत सिद्धिकी आणि सहकार्य म्हणून मोहम्मद सिद्दिकी, सय्यद खाजा, सय्यद अफरोज, साहिल पठाण, इस्माईल पठाण
या सर्वांच्या परिश्रमामुळे वाटप प्रक्रिया सुरळीत पार पडली. "संकट काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हाच संघटनेचा मुख्य उद्देश आहे," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाचा लाभ परिसरातील अनेक कुटुंबांनी घेतला असून त्यांनी संघटनेचे आभार मानले आहेत.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी