जुनाट प्रथा झुगारून एकल महिलांचा– तिळगुळ कार्यक्रम
बीड प्रतिनिधी:-एकल महिला संघटना आयोजित मकर संक्रांत निमित्ताने परंपरेला समाज प्रबोधनाची जोड देऊन एकल महिलांचा तिळगूळ कार्यक्रम झाला.
विधवा महिलेचा तिळगुळ विधायक कार्यक्रम बीड येथील गर्गे वाचनालय येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन एकल महिला संघटनेच्या रुक्मिणी ताई नागापुरे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला तसेच उपस्थितीमध्ये घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
एकल महिलांचा हळदी- कुंकू कार्यक्रम हा परंपरेला छेद देत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बदलत्या जीवनमानात महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून एकल महिलांसाठी केलेल्या कामकाजाचा बद्दल माहिती व तसेच सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांच्या कार्यावर रुक्मिणीताई नागापुरे यांनी मार्गदर्शन केले
महिलांशी एकटेपण पेलताना या विषयावर संवाद केला. आयुष्यात संकट आली तरी संघर्ष हा करावा लागतो. महिलाही खंबीरपणे आयुष्य हे पेलत असते. आपल्या देशाच्या राष्ट्रपती यांच्या जीवनाबद्दल त्यांनी माहिती दिली. आज अनेक भगिनींना घरातील कमवता व्यक्ती गेल्यामुळे घरातील सर्व जबाबदारी महिलेवर आहे. मुलांचे शिक्षण कुटुंबाची जबाबदारी या सर्व परिस्थितीमध्ये तिचं एकटे पण पेलत असताना तिला समजून घेणे हे अत्यंत गरजेचं असतं. या दृष्टिकोनातून एकल महिला संघटना अनेक वर्षापासून विधवा महिलांसाठी काम करत आहेत.
यावेळी महिलांना खादी ग्रामोद्योग व केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेविषयी माहिती दिली. महिलांना स्वयंरोजगाराच्या दृष्टिकोनातून अनेक योजना उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळोवेळी एकल महिला संघटना सहकार्य व मार्गदर्शन महिलांना करण्यात आले
तिळगुळ कार्यक्रमांमध्ये महिला जवळपास 50 उपस्थित होते हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पूजा काळे रेखा खंडागळे संध्या शिरसाट तेजस्विनी उबाळे रुक्मिणी ताई नागापुरे शिल्पा पंडित शितल भोईटे कोंडाबाई कळसकर अर्चना बोराडे सुनिता क्षीरसागर मंगल भोसले छाया गोरे स्वाती जाधव रेणुका गोरे
यांनी प्रयत्न केले यावेळी बहुसंख्येने महिला उपस्थित होते या कार्यक्रमाची सांगता प्रास्ताविक वाचन करून करण्यात आली
Comments
Post a Comment