लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात “दर्पण दिन” उत्साहात साजरा
लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात “दर्पण दिन” उत्साहात साजरा
लिंबागणेश : (दि.०६)आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दि. ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केलेल्या मराठीतील पहिल्या वृत्तपत्र *“दर्पण”*च्या स्मरणार्थ साजरा होणारा दर्पण दिन आज मंगळवार दि. ०६ जानेवारी रोजी बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलेश्वर संस्थान मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्निल भैय्या गलधर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी मस्के, मराठा सेवक हनुमान मुळीक आणि तुलसीदास महाराज उपस्थित होते.
कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य राजेभाऊ आप्पा गिरे, अॅड. गणेश वाणी, माजी उपसरपंच शंकर वाणी, ग्रामपंचायत सदस्य श्रीहरी निर्मळ, दामोदर थोरात, रमेश गायकवाड, सर्पमित्र अशोक जाधव, जीवन मुळे, सुरेश निर्मळ, सचिन आगवान, रवी वायभट, अंकुश गायकवाड, रामचंद्र मुळे, तुकाराम गायकवाड, संजय पावले, मोहन कोटुळे, नवनाथ मुळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. गणेश ढवळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन गणपत तागड यांनी केले.
दर्पणमधून समाजाला दिशा देण्याचे कार्य : डॉ. गणेश ढवळे
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे म्हणाले,
“पत्रकार दिन हा केवळ शुभेच्छांचा सोहळा नसून समाजाच्या आरशात उभ्या असलेल्या पत्रकारितेच्या दीर्घ, संघर्षमय व प्रेरणादायी प्रवासाचा मागोवा घेण्याचा दिवस आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्रातून समाजाला दिशा दिली, तसेच ‘दिग्दर्शन’ मासिकातून सामाजिक प्रबोधन घडवून आणले.”
Comments
Post a Comment