मलकापूर येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्काराने युवा कलाकार सुदाम लिंबराज मासाळ सन्मानित




 बीड प्रतिनिधी. :- मराठी पत्रकार दिनानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघा च्या वतीने आयोजित दर्पण रत्न राज्यस्तरीय पुरस्कार 2026 कार्यक्रम मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला .आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001_2015 प्रमाणित हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दर्पण रत्न राज्यस्तरीय पुरस्कार 2026 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये गेवराई तालुक्यातील मौजे ईटकुर येथील प्रतिभावंत युवा कलाकार सुदाम लिंबराज मासाळ यांना सन्मानित करण्यात आले.
   या शानदार सोहळ्यात बीड जिल्ह्यातील मौजे ईटकुर येथील प्रतिभावंत युवा कलाकार सुदाम लिंबराज मासाळ यांना राज्याचे सहाय्यक माहिती आयुक्त मा निलेशजी तायडे साहेब यांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृती चिन्ह,शाल,श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
    महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना दर्पण रत्न पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आले. 
दर्पण रत्न पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश तायडे सहाय्यक माहिती आयुक्त मंत्रालय मुंबई , कार्यक्रमाचे उद्घाटक
डॉ. प्रा. अनिल खर्चे (प्राचार्य व्ही. बी. कोलते इंजीनियरिंग कॉलेज) , तर प्रमुख पाहुणे अशांत भाई वानखेडे संस्थापक समतेचे निळे वादळ , धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, बंडूभाऊ चवरे उद्योजक, बाळासाहेब दामोदर उद्योजक , दामोदर शर्मा शेतकरी नेते, विजय डागा, बंडू चौधरी, सुभेदार दिनेश तायडे कारगिल योद्धा, चंद्रकांत वर्मा, हे होते कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण,सामाजिक,राजकीय, चित्रपट सृष्टीतील कलाकार,कला, वैद्यकीय, उद्योजक, क्रीडा अशा अनेकविध क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार दर्पण रत्न पुरस्कार 2026 देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी देशासाठी आपल्या प्राणाची परवा न करता देशसेवा करणाऱ्या तसेच कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सुभेदार दिनेश तायडे माजी सैनिक यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.
      ईटकुर येथील युवा कलाकार सुदाम मासाळ यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल महा एनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव ढाकणे यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुदाम मासाळ यांच्यावर मित्र परिवारासह मान्यवर मंडळींचा शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी