विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी सुरज जावळे यांची एकमताने निवड; मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव


पाटोदा (प्रतिनिधी) संपूर्ण देशाला सामाजिक न्याय, समता व बंधुतेचा संदेश देणारे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी सुरज जावळे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.या निवडीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात सागर आप्पा धस, नगराध्यक्ष राजू भैय्या जाधव तसेच नगरसेवक प्रकाश जावळे यांनी सुरज जावळे यांना शुभेच्छा देत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.सुरज जावळे यांच्या नेतृत्वाखाली यंदाचा जयंती उत्सव अधिक नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी स्वरूपात साजरा होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमास आंबेडकरवादी कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीमुळे येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि समाजप्रबोधन करणारा ठरेल, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त केला जात आहे.

Comments

News23marathi

पाटोदा तालुक्यातील मेंगडेवाडी गावात बिबट्याच्या हल्ल्यात वयोवृद्ध महिलेचा मृत्यू

शेवगाव येथे गेवराई रोडवरील जुना तळणी फाटा येथे थरारक गोळीबाराची घटना. एक जण अत्यवस्थ

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी