जातीय द्वेषातून रा.प. अधिकार्याकडून सातत्याने छळ
बीड । प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बीड आगारात कार्यरत असलेले वाहतूक निरीक्षक भिमकिरण विनायक बनसोडे यांनी वरिष्ठ अधिकारी निलेश पवार यांच्यावर जातीय भावनेतून मानसिक, प्रशासकीय व वैयक्तिक छळ केल्याचा गंभीर तक्रार करत रा .प.प्रशासनाकडुन न्याय देण्यात यावा मागणी केली आहे. मागासवर्गीय समाजातील असल्यामुळेच आपल्यावर अन्याय केला जात असल्याचा थेट तक्रार त्यांनी केलीआहे.
बनसोडे हे मागील दोन वर्षांपासून बीड आगारात प्रामाणिकपणे सेवा बजावत असताना, सन 2022-23 या कालावधीत तत्कालीन आगार व्यवस्थापक निलेश पवार यांनी जाणीवपूर्वक खराब सी.आर. लिहून बढती रोखण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार त्यांनी केली. सहाय्यक वाहतूक अधिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आणि प्रतिक्षा यादीत नाव असतानाही जातीय आकसातून बढतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न वरीष्ठ अधिकारी श्री निलेश पवार करीत आहेत.
यानंतर निलेश पवार यांची बदली विभागीय कार्यशाळेत ओ.एम.ई. म्हणून झाली. मात्र तेथे असतानाही त्यांना कर्मचारी वर्ग अधिकारी (डीपीओ) पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आणि त्या अधिकाराचा गैरवापर करून बनसोडे यांची बीड आगारातून धारूर आगारात नियमबाह्य बदली करण्यात आली, होती. तेव्हापासून सतत मानसिक व प्रशासकीय त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचे माहिती मिळते
दरम्यान, दि. 08 ऑक्टोबर 2025 रोजी कुमशी (शाळा) कर्तव्यावर असलेल्या बसला मागून कारची धडक बसली होती. या घटनेत बसचे किरकोळ नुकसान झाले असून नुकसानभरपाई 5 हजार रुपये संबंधित वाहन मालकाकडून तात्काळ वसूल करून बस दुरुस्त करण्यात आली. त्याच दिवशी बस पुन्हा मार्गावर सोडण्यात आली व तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ ती नियमितपणे चालू होती.मात्र, दोन महिन्यांनंतर सहाय्यक यंत्र अभियंता निलेश पवार यांनी जाणीवपूर्वक सदरील बस विभागीय कार्यशाळेत बोलावून खोटा पंचनामा तयार केला व खोटा अहवाल सादर करून बनसोडे यांच्यावर चौकशी लादली, आलीआहे. नुकसानभरपाई नियमानुसार भरली असतानाही केवळ आपण मागासवर्गीय असल्यामुळेच आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा तक्रार बनसोडे यांनी केला.एकीकडे सी.आर. खराब करणे, दुसरीकडे नियमबाह्य बदली आणि आता खोटी चौकशी - हा सर्व प्रकार जातीय द्वेषातून आणि सूडभावनेतून केला जात आहे, असा ठपका त्यांनी ठेवला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून आपल्याला नैसर्गिक न्याय द्यावा, तसेच जातीय भावनेतून छळ करणार्या निलेश पवार यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी वाहतूक निरीक्षक भिमकिरण विनायक बनसोडे यांनी व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्याकडे केली आहे.
Comments
Post a Comment