निर्भीडपणे सत्यशोधन करणाऱ्या पत्रकारामुळेच देशातील लोकशाही जिवंत- मिलिंद घाडगे
परळी प्रतिनिधी. भारतीय राज्यघटनेने बहाल केलेली धर्मनिरपेक्ष लोकशाही निर्भीडपणे सत्याचा शोध घेणाऱ्या काही मोजक्याच पत्रकारांमुळे टिकून आहे. स्वाभिमानी पत्रकारांनी निसार्थपणे वंचित समूहांच्या समस्यांना प्राधान्य देऊन जगासमोर सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा उघड करून चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांनी केले आहे.
नुकतीच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची परळी तालुका व शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे यांच्या निवासस्थानी करण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष धीरज जंगले, शहराध्यक्ष किरण दौंड, कार्याध्यक्ष आत्मलिंग शेट्टे, उपाध्यक्ष अनिल गायकवाड, कोषाध्यक्ष संदीप मस्के, उपाध्यक्ष अभिमान मस्के, सचिव माणिक कोकाटे, कार्याध्यक्ष अनंत कुलकर्णी, प्रसिद्धीप्रमुख विजय रोडे, सहकोषाध्यक्ष गणेश अदोडे इत्यादी पत्रकारांचा पुष्पहार, समतेचा स्कार्फ, व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक भेट देऊन करण्यात आला. यावेळी मिलिंद घाडगे यांनी पुढे बोलताना सांगितले की चळवळीला व चळवळीतील कार्यकर्त्यांना बळ द्यावे. पत्रकारांच्या पाठिंब्याशिवाय अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभा केलेलं समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही म्हणून पत्रकारांनी निर्भीडपणे लेखणी चालवून नाहीरे वर्गाच्या चळवळी टिकवल्या पाहिजे. अशी अपेक्षा पत्रकारांकडून व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे ता. युवा अध्यक्ष राजेश सरवदे, ता. युवा महासचिव ज्ञानेश्वर गीते, ता युवा उपाध्यक्ष आदर्श जंगले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment