पदवीधर मतदारसंघ यादी प्रकाशित जिल्ह्यात 54206 एकूण मतदार
बीड, प्रतिनिधी :- 1 नोव्हेंबर 2025 अर्हता दिनांक निश्चित करून तयार करण्यात आलेला 5-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीचे अंतिम प्रकाशन आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या यादीमध्ये मसुद्यानुसार 47174 मतदार होते. यात नव्याने 7716 नावे वाढविण्यासाठी मतदारांनी अर्ज सादर केले. छाननीनंतर यापैकी 436 जणांचे अर्ज अस्विकृत ठरले त्यामुळे 7280 नावे यादीत सामील करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
यादीतील नावांबाबत 11 आक्षेप दाखल झाले ते सर्व स्विकारण्यात आले आहेत. यादीतून एकूण 248 नावे वगळण्यात आली आहेत यानंतर अंतिमतः 7032 नावे वाढली असून यादीत आता जिल्हयातील मतदारांची एकूण संख्या 54206 इतकी झाली झाली. यात 42282 पुरुष तर 11922 महिला व 2 इतर मतदार आहेत.
Comments
Post a Comment