धानोरा रोडच्या 50 फूट रुंदीकरणासाठी बीड शहर बचाव मंचाची जिल्हाधिकाऱ्यांची भेट
धानोरा रोडच्या 50 फूट रुंदीकरणासाठी बीड शहर बचाव मंचाची जिल्हाधिकाऱ्यांची भेट
कामामध्ये तांत्रिक बदल करून वाढीव निधी द्या... नितीन जायभाये
बीड प्रतिनिधी : धानोरा रोडच्या कामात तात्काळ तांत्रिक बदल करून 50 फूट रुंदीकरणासह भक्कम-दर्जेदार सिमेंट काँक्रीट रोडचे निर्माण करण्यात यावे तसेच यासाठी लागणारा वाढीव निधी तात्काळ मंजूर करण्यात यावा, या सर्व मागण्यासाठी बीड शहर बचाव मंचाचे वतीने जिल्हाधिकारी जॉन्सन साहेबांची भेट घेण्यात आली. यावेळी बचाव मंचाचे अध्यक्ष नितीन जायभाये यांनी रोडच्या बाबतीत तांत्रिक बदल करण्यासाठी तसेच वाढीव निधीची तरतूद करण्यासाठी यासंदर्भातील सर्व अधिकार जिल्हाधिकारी साहेब तुम्हालाच आहेत असे स्पष्टीकरण मांडले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भातील सर्व बाबी तपासून या संबंधातील सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ निर्णय घेऊ असे आश्वासित केले आहे. तरी बीड शहर बचाव मंचाच्या शिष्टमंडळाने यासंदर्भामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना असे निवेदन केले आहे की, जिल्हाधिकारी साहेब आपण नियोजन समितीच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांपासून व खूपच काळ प्रलंबित राहिलेल्या धानोरा रोड साठी प्राधान्यक्रम देऊन नव निर्मिती साठी व त्यासंदर्भातील मंजुरींसाठी सहकार्य केलेले आहे. तरी वस्तुस्थिती अन्वये धानोरा रोड हा बीड शहराला नूतन मुख्य रेल्वे स्थानकाला तसेच अनेकानेक गाव खेड्यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. याच रस्त्यावर नऊ ते दहा शाळा-विद्यालये आहेत. तसेच शहराच्या वाढत्या विस्ताराबरोबरच वाढत्या लोकसंख्येप्रमाणे धानोरा रोड वरून मोठे दळणवळण दररोज होत असते. धानोरा रोड वरून होणाऱ्या दैनंदिन रहदारीच्या गरजेनुसार या रस्त्याचे नवनिर्माण भक्कम पद्धतीचे, दर्जेदार व पुरेशा रुंदीकरणासह होणे गरजेचे आहे. तरी स्थानिक जनतेच्या व रहदारीच्या गरजेनुसार या रस्त्याचे निर्माण कमीत कमी 50 फूट रुंदीकरणासह करण्यात यावे तसेच यासाठी लागणारा वाढीव निधी तात्काळ मंजूर करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. सद्यपरिस्थितीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या निधीमध्ये पन्नास फूट रुंदीकरणासह रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे व सुरुवातीपासूनच 50 फूट रस्त्याचे निर्माण करण्यात यावे. अशा प्रकारे केलेले रस्त्याचे निर्माण हे प्रदीर्घकाळ उपयोगी ठरणारे तसेच वाढत्या विस्ताराच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे. अशी मागणी स्थानिक जनता व बीड शहर बचाव मंचाच्या वतीने करण्यात येत आहे. याच अनुषंगाने स्थानिक जनता व बीड शहर बचाव मंच, केलेली मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देत आहे. यावेळी शिष्टमंडळामध्ये प्राचार्य कॉ.डी.जी तांदळे सर, अध्यक्ष नितीनजी जायभाये, प्राचार्य कॉ. राजकुमार कदम सर, रणरागिनी प्रतिष्ठानच्या आम्रपाली साबळे, पत्रकार संपादक साहस आदोडे, बाजीराव ढाकणे, शिवसेनेचे रतन गुजर, एस डी पी आय पार्टीचे तखियोद्दिन काझी, कलीमभाई फारोकी, डॉ संजय तांदळे, रामधन जमाले,ॲड.अनिल बारगजे,ॲड.नितीन वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Comments
Post a Comment