उमेद अभियानातील महिला व कर्मचारी यांचे नागपूर अधिवेशनात पहिल्याच दिवशी लाखोंचा सहभाग
नागपूर (प्रतिनिधी)(11 डिसेंबर 2025)
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कल्याणकारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील 84 लक्ष ग्रामीण कुटुंबातील स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून सहभागी आहेत. जवळपास 3 लक्ष 64 हजार 565 महिला उपस्थित यशवंत स्टेडियम मैदान नागपूर येथे स्वतःच्या मागण्याकरिता सहभागी झाले असून असंख्य महिलांनी पहिल्याच दिवशी अन्य त्याग केलेला आहे. तर भर उन्हात बसण्याची वेळ आलेली आहे.दुसऱ्या दिवशी याच महिला व कर्मचारी पाणी त्याग करण्याचा संकल्प घेतला असून तीव्र आंदोलन सुरूच राहणार आहेत. आज भर उन्हामध्ये शासन आपल्या मागण्या पूर्ण करनार का? अशा उमेदीने बसलेले आहे.जो पर्यंत शासन मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत यशवंत मैदान नागपूर येथे राहण्याचा असा निर्धार आपल्या महिलांनी केलेला आहे.
प्रमुख मागण्या:-
उमेद अभियानाचा स्वतंत्र्य विभाग करून, सर्व कंत्राटी कर्मचारी कायम करावेत..
शासन सेवेत कंत्राटी कर्मचारी यांना समाविष्ट करून घ्यावे.
समुदाय संसाधन व्यक्ती सर्व केडर यांना ग्रामसखी पदावर मान्यता देऊन मानधन वाढ देण्यात यावी.
कर्मचारी यांची IJP करण्यात यावी
प्रभाग समन्व्यक यांना जिल्हा बदली करण्यात यावी.
CSC चा प्रश्न सोडवावा.. गटांना भरभरून शासकीय निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागण्यासह महिलांनी शासनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून मागण्या मान्य करण्यासाठी नवीन उमेदीने आलेल्या आहेत. या मागाण्यांकडे
महाराष्ट्रातील 24 लक्ष कुटुंबातील गटातील महिला अधिवेशनात विविध प्रसारमाध्यमाच्या, माध्यमातून लक्ष केंद्रित केलेले आहे..
पहिल्याच दिवशी माननीय आमदार श्री. संजय मेश्राम साहेब, माननीय आमदार श्री गोपीचंद पडळकर साहेब, आदपाटी सांगली.माननीय आमदार श्री राजेश पाडवी शहादा जिल्हा धुळे, माननीय आमदार मंजुळाताई गावित साखरी धुळे जिल्हा, माननीय आमदार श्री. आमशा पाडवी अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार. माननीय श्री. किशोर यशवंता पाचखीड्डे. यांनी उपस्थिती दर्शविली आहे.
Comments
Post a Comment